Agriculture University : राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत – कृषिमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी (Agriculture University) शेतीविषयक शिक्षण आणि संशोधनात मोलाचे योगदान द्यावे. राज्य सरकारकडून विद्यापीठांना वेळोवेळी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर्व कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाने आपली कृषी विद्यापीठे जागतिक दर्जाची कशी होतील. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची (Agriculture University) 114 वी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

अत्याधुनिक सुविधांवर भर द्यावा (Agriculture University 114th Meeting)

बाहेरील देशांमधील विद्यार्थ्यांना आपल्याकडील कृषी शिक्षण पद्धतीचे आकर्षण वाटावे. त्यांना इकडे येऊन शिक्षण घेण्यासाठी भारतीय कृषी पद्धतीचा अभ्यास करता यावा. यासाठी आपली कृषी विद्यापीठे (Agriculture University) आंतरराष्ट्रीय दर्जाची असायला हवी. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयातील इमारती, वसतिगृह आणि प्रयोगशाळा या सुविधा अत्याधुनिक हव्यात. सोबतच भारतीय विद्यार्थी, शेतकरी यांचीही कृषी संशोधनातून प्रगती व्हावी. अशा सूचनाही यावेळी कृषिमंत्री मुंडे यांनी दिल्या आहेत.

बैठकीत 143 विषयांवर चर्चा

मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण 143 विषयांवर चर्चा झाली. यामध्ये शिक्षण विभागाचे एकूण 15 विषय, संशोधन विभागाचे 6 विषय, साधनसामग्री विकास विषयाचे 111 विषय, प्रशासन शाखेचे चार, वित्त शाखेचा एक आणि सेवा प्रवेश मंडळाच्या सहा विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत सहा घटक कृषी व संलग्न महाविद्यालये आणि एक विनाअनुदानित महाविद्यालय या सोबतच विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रांसाठी नियमावली आणि फणस संशोधन केंद्र यास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय मुख्यमंत्री संशोधन निधी अंतर्गत अकोला आणि राहुरीच्या एकूण 50 कोटी रुपयांच्या अनुक्रमे आठ आणि 18 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये संशोधन केंद्रांचे आणि तिथे उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण याचा समावेश आहे. यासोबतच साधन सामुग्री विकासात अग्निशमन सुरक्षा व वसतिगृहांचे सौर ऊर्जा प्रकल्प, मुलींसाठी सहा नवीन वसतिगृहांची स्थापना अशा विषयांवर देखील चर्चा झाली आहे. या बैठकीला राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. विवेक दामले, चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व इतर उपस्थित होते.

error: Content is protected !!