Agro Vision : शेतकऱ्‍यांपर्यंत नवीन पद्धती, तंत्रज्ञान पोहचवण्यात यश – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन (Agro Vision) शेतकऱ्यांसाठी एक ‘नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह’ घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल ॲग्रो व्हिजनच्या (Agro Vision) माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शनाच्या समारोपावेळी ते नागपूरात बोलत होते. यावेळी केंद्रीय दळणवळण व परिवहन मंत्री नितीन गडकरी, अरुणाचल प्रदेशचे कृषी मंत्री तागे टाकी, उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही उपस्थित होते. नागपुरात जागतिक दर्जाच्या ॲग्रो कन्वेंशन सेंटरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या काळात ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन या कन्व्हेन्शन सेंटर मध्ये घेता येईल. संत्र्याच्या निर्यातीवर बांग्लादेशने आकारलेल्या शुल्कामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. लवकरच सरकारच्या पातळीवर निर्णय घेत शुल्कासंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

‘सहा हजार कोटींचा निधी(Agro Vision Exhibition In Nagpur)

राज्य सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत पहिल्या टप्प्यात जागतिक बँकेने 4 हजार कोटी रुपये दिले आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश करण्यात आला होता. आता दुस-या टप्प्यात जागतिक बँकेकडून सहा हजार कोटी रुपये मिळाले असून, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विषमुक्त शेतीसाठी प्रयत्न

विषमुक्त शेती ही संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून येत्या दोन वर्षात सुमारे 35 लाख हेक्टर शेती क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. यासोबतच जलसंधारणाच्या कामासाठी जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला असून, अवर्षणग्रस्त भागात जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!