मुख्यमंत्री सहायता निधीला नगर जिल्हा बँकेकडून निधी; शेतकरी बांधवांनाही मदत करण्याचा मानस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । करोना काळामध्ये सगळीच लोक एकमेकांना साहाय्य करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. भारत सध्या करोनाच्या भीषण संकटाला तोंड देत आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरूनही मदत भारतात पोहचत आहे. अनेक मित्र राष्ट्र भारताला आवश्यक ती मदत पोहचवत आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्टार्स मदतीची घोषणा करत आहेत. सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

आणि राज्यांचा विचार केला तर त्यात महाराष्ट्रांची परिस्थिती जरा जास्त बिकट दिसते. म्हणून महाराष्ट्रतूनही वयक्तिक किंवा सांघिक मदत केली जात आहे. अश्यातच नगर जिल्हा सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत दिली आहे.

नगर जिल्हा बँक नेहमीच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या आणि शासनाच्या मागे उभी असते. बँकेने वेळोवेळी संकटाच्या काळात भरीव मदतही केली आहे अशी भूमिका बँकेने घेतली आहे. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही रक्कम जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्याकडून स्वीकारली

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!