AI For Onion : आता कांदा सडणार नाही; सरकारकडून सुरुये ‘या’ तंत्रज्ञानावर काम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) (AI For Onion) या तंत्रज्ञानाचा वापर जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये वाढत आहे. शेती क्षेत्रही त्यापासून वेगळे नाही. याच तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील होणारी कांदा नासाडी थांबवली जाणार आहे. देशात रब्बी हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या जवळपास एक चतुर्थांश कांद्याची नासाडी होते. त्यामुळे देशात जवळपास 11 हजार कोटींचा कांदा सडल्याने खराब होतो. याच पार्श्वभूमीवर कांद्याची सडघाण (AI For Onion) थांबवण्यासाठी सरकारकडून आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

कांद्याची स्थिती समजणार (AI For Onion Spoilage In India)

आर्टिफिशियल इंटेलिजेंस या तंत्रज्ञानाचा वापर करून सेन्सरच्या मदतीने कांद्याची सडण्याची आणि खराब होण्याची आकडेवारी मिळू शकणार आहे. इतकेच नाही तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने साठवून ठेवलेला कोणता कांदा खराब होतोय. तर कोणता कांदा हा उत्तम स्थितीत आहे, हेही समजू शकणार आहे. त्यामुळे कांद्याची साठवणूक करून ठेवलेला कांदा खराब होण्यापासून तात्काळ प्रतिबंध घातला जाऊ शकतो. कारण वेळीच सडलेला कांदा हा साठवणूक केलेल्या जागेतून बाजूला केल्यास अन्य कांद्याची नासाडी होण्यापासून थांबली जाणार आहे.

सरकारचा पायलट प्रोजेक्ट

कांदा सडून खराब होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून एक पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. ज्या माध्यमातून देशभरात 100 आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञान आधारित कांदा साठवणूक केंद्र उभारली जाणार आहेत. आगामी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये या कांदा साठवणूक केंद्रांची संख्या 500 केंद्रांपर्यंत वाढवली जाणार आहे. यासाठी सरकारकडून किती निधी उभारला जाऊ शकतो. याबाबत माहिती सध्या तरी समोर येऊ शकलेली नाही.

साठवणुकीचा कालावधी वाढणार

खरीप हंगामातील कांदा हा तसाही साठवणूक करून ठेवण्याच्या लायक नसतो. मात्र रब्बी आणि उन्हाळी आणि हंगामातील कांद्याची देशात मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते. मात्र आता या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कांद्याचे स्वतःचे आयुष्य वाढणार असून, तो जास्त दिवसांपर्यत साठवून ठेवण्यास मदत होणार आहे. साधारणपणे मे महिन्यात उत्पादित केलेला उन्हाळी कांदा हा डिसेंबर महिन्यापर्यंत साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यातील जवळपास एक चतुर्थांश कांदा खराब होतो. त्यामुळे आता कांद्याची ही नासाडी या तंत्रज्ञानाच्या मदतीने थांबणार आहे.

error: Content is protected !!