Ajit Pawar Gotha : अजित पवारांचा 55 गाईंचा काटेवाडीतला गोठा पाहिलाय का? व्यस्थापन अन् दुध किती निघतं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ajit Pawar : आपल्याकडे सर्वजण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसत आहेत. सामान्य लोकांचा आर्थिक खर्च हा दूधव्यवसायावर अवलंबून आहे. आता सामान्य लोक ठीक पण जर मोठ्या राजकीय नेत्यांनी दूधव्यवसाय केला तर? या गोष्टीवर तुमचा पण विश्वास बसणार नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील काटेवाडी या ठिकाणी जवळपास ५५ गाईंचा गोठा आहे. आता अजित पवारांच्या गोठ्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात.

कधीपासून सुरु केला अजितदादांनी दूध व्यवसाय

अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर दूध व्यवसाय चालू केला आहे. सुरवातीच्या काळामध्ये त्यांचा घरखर्च हा दूध व्यवसायावर चालायचा. त्यानंत अजित पवार एक गाय विकायचे आणि एक एकर जमीन घ्यायचे त्याकाळी जमीन स्वस्त होती. म्हणून एक गाय विकून एक एकर जमीन यायची अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

सध्याच गोठा व्यवस्थापन कस आहे?

सध्या अजित पवार यांच्या गोठ्यामध्ये ५५ गायी आहे. यासाठी त्यांचा मुक्त गोठा आहे. गोठ्यातील कामे करण्यासाठी त्या ठिकाणी दोन मजूर देखील आहेत. एक मजूर त्याच ठिकाणचा रहिवासी असून दुसरा मजूर हा बिहारचा रहिवासी आहे. त्यांच्या गोठ्यामध्ये जर्शी गायी, त्याचबरोबर गीर गायी, गायचे वळू, म्हैस हे सर्व आहेत.

Ajit Pawar Buffalo Farm in Baramati

दूध किती जाते?

अजित पवार यांच्या गोठ्यात मिल्क पार्लर देखील खूप चांगल्या पद्धतीने बनविले आहे. सध्या त्यांचे १०० लिटरच्या आसपास दूध जाते. याबाबत माहिती देताना त्या ठिकाणचा मजूर म्हणाला, सध्या बऱ्याच गायी गाभण आहेत त्यामुळे दूध कमी जात आहे. मात्र सर्व गायी वेल्यावर २०० लिटरच्या पुढे दूध जाते. त्याचबरोबर या ठिकाणी गाईंना मुक्तगोठ्यामध्ये मोठ्या झाडांची सावली देखील आहे.

error: Content is protected !!