नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ajit Pawar : नियमित कर्ज फेरकड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजारांचे अनुदान मिळणार अशा मागच्या काही दिवसापासून बातम्या येत आहेत. मात्र असे असले तरी 50, 000 प्रोत्साहन पर अनुदान मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाईल असं स्पष्ट केल आहे.

15 ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले होते. हे ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. . यावेळी बोलताना त्यांनीही वक्तव्य केले आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र लवकरच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली होती. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यास काही निधी कमी पडला होता. मात्र याबाबत पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली असून तो निधी मंजूर झाला आहे त्यामुळे प्रोत्साहन पर अनुदानाच्या नियमांमध्ये जे शेतकरी बसत आहेत. त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे असे ते म्हणाले आहेत.

त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बिलासाठी कनेक्शन तोडले जाते यावर देखील अजित पवारांना प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कुठे तोडले जात असेल तर मी यासंदर्भात ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करेल.

हॅलो कृषी ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केले का?

सध्या तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे प्रत्येकाला घरी बसून सर्व गोष्टींची माहिती हवी असते. याच गोष्टीचा विचार करून आम्ही देखील शेतकऱ्यांसाठी एक खास बनवले आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi. ज्यामुळे शेतकरी अगदी घरी बसून त्यांची शेती बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता. यामध्ये पिकांचे बाजार भाव असतील रोजचा हवामान अंदाज असेल सरकारी योजनांची माहिती असेल पशुंची खरेदी विक्री असेल काही जुगाडांची माहिती असेल सातबारा उतारा असेल अशा अनेक गोष्टींची माहिती शेतकरी एकाच ॲप मधून मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायला विसरू नका ते लगेचच इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!