आता ‘या’ शेतकर्‍यांनाही सरकार देणार अनुदान; अजित पवारांची विधानसभेत माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणा पासून कदापि पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली आहे.

याबाबत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनामुळे राज्याची तसेच देशाची परिस्थिती कमकुवत झाली आहे लॉक डाऊन मुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटीचे उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच अशी घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देणारे हे एकमेव राज्य आहेत असंही अजित पवार यांनी सांगितलं. आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली.

ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी तीन निर्णय घेतले होते. यामध्ये दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तर दोन लाखावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

या योजनेअंतर्गत 31 लाख 81 हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवले 20000 290 कोटींचे वाटप करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांना पुरवणी मागण्या तरतूद केल्यामुळे प्रमाणे मदत मिळेल तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करू अशी घोषणा हे अजित पवार यांनी यावेळी केली.

काय म्हणाले पवार

— कोरोनामुळे राज्यासह देशाची परिस्थिती कमकुवत
— लॉकडाऊन मुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले.
— आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना मदत
— कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत ते शून्य टक्के व्याजाने देणारे एकमेव राज्य.

Leave a Comment

error: Content is protected !!