Aloe Vera Farming : कोरफड शेतीतून उभा केला 10 कोटींचा व्यवसाय; शेतकऱ्याची एक एकरातून भरारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे (Aloe Vera Farming) वळत आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील औषधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांपेक्षा अधिकचे उत्पन्न (Income) मिळवण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (Farmer Success Story) पाहणार आहोत. जे शेतीची कोणतीही माहिती नसताना, 12 वर्षांपासून कोरफड शेती (Aloe Vera Farming) करत आहे. विशेष म्हणजे कोरफड लागवडीतून, त्यांनी स्वतःचे 45 वेगवेगळी उत्पादने (Aloe Vera Farming) तयार केली आहे. ज्यातून त्यांना वार्षिक जवळपास 10 लाख रुपयांचा टर्नओव्हर होत आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर चहाविक्री (Aloe Vera Farming 10 Crores Business)

अजय स्‍वामी असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्याच्या परलीका गावचे रहिवासी आहे. शेतकरी अजय स्‍वामी यांची केवळ एक एकर वडिलोपार्जित शेती (Ancestral Land) होती. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांनी काही काळ चहा विक्रीचा व्यवसाय केला. मात्र, रोजचे तेच तेच काम करण्यातून कंटाळलेल्या अजय यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निश्चय मनी पक्का केला. त्यातूनच त्यांना कोरफड शेतीकडे (Aloe Vera Farming) वळण्याचा विचार मनात आला. त्यानुसार, त्यांनी कोरफड शेतीबाबत इथंभूत माहिती मिळवली.

शेतकरी अजय स्वामी यांना आपल्या वडिलांकडून केवळ एक एकर शेती मिळाली होती. त्यांच्याकडे शेतीचा तसा अनुभव देखील नव्हता. असे असतानाही त्यांनी कोरफड शेतीची निवड केली. यासाठी सर्वप्रथम त्यांनी कोरफडीची रोपे उपलब्ध केली. विशेष म्हणजे त्यांनी गावातील स्मशानभूमीजवळ नदीला असलेल्या कोरफडीची रोपे देखील आपल्या शेतीसाठी वापरली. या रोपांची व्यवस्थित देखभाल आणि खतपाणी देऊन त्यांनी कोरफडीची शेती फुलवली.

स्वतःचे ब्रँड केले विकसित

दीड वर्षानंतर कोरफड लागवडीतून (Aloe Vera Farming) त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यांनी आपली उत्पादित कोरफड थेट कंपन्यांना विक्री करण्याऐवजी त्यांनी स्वतःची उत्पादने निर्माण केले. यामध्ये त्यांनी कोरफडीपासून उत्पादने तयार कारण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्पादित कोरफडीपासून (Aloe Vera) साबण, शॅम्पू, फेश वॉश ही उत्पादने विकसित केली. याशिवाय त्यांनी कोरफडीपासून मिठाई तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचा कोरफडीचा लाडू विशेष प्रसिद्ध आहे. हा लाडू ते 350 रुपये प्रति किलो दराने विक्री करतात. यासाठी अजय यांनी आपल्या जमिनीवर प्रक्रिया उद्योग उभारला आहे.

किती होतीये कमाई?

अजय यांनी कोरफड शेतीच्या माध्यमातून आपली स्वतःची जवळपास 45 उत्पादने विकसित केली आहे. मागील 12 वर्षांपासून ते या उद्योगात उतरले असून, त्यांना त्यातून वार्षिक 10 लाखांची कमाई होत आहे. विशेष म्हणजे अजय यांनी केवळ एक एकर शेतीच्या माध्यमातून उद्योग उभा केल्याने, ते आपल्या आसपासच्या परिसरातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहे.

error: Content is protected !!