Amrit Mahal Cow: कर्नाटकचा अभिमान म्हैसूरची ‘अमृतमहल’ गाय; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात वेगवेगळ्या भागात गायींच्या जाती (Amrit Mahal Cow) प्रसिद्ध आहेत. काही जाती दूध उत्पादनासाठी तर काही शेत कामासाठी उपयुक्त ठरतात. परंतु काही अशाही जाती आहेत ज्या दोन्ही कामासाठी वापरल्या जातात. अशाच एका गायीच्या जातीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ही गाय आहे ‘अमृतमहल’(Amrit Mahal Cow).

अमृतमहल गायीची वैशिष्ट्ये (Amrit Mahal Cow Breed Features)

मूळची म्हैसूरची असणारी ही गायीची जात दूध उत्पादन आणि शेती कामासाठी (Dual Purpose Cow) सुद्धा वापरली जाते. ही प्रजाती ‘हल्लीकर’ या प्रजातीपासून निर्माण झालेली आहे. या भारतीय गोवंशामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तग धरून राहण्याची क्षमता चांगली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने या देशी गायीच्या (Indian cow Breeds) दुधाची किंमत जास्त आहे. या गायीचे सरासरी आयुष्य 18 ते 20 वर्षे असते.  

शरीर वैशिष्ट्ये

या गायीचा रंग पांढरा, राखाडी असतो. काही गायी नुसत्या पांढर्‍या किंवा राखाडी रंगाच्या असतात.  गायीचे शिर, सरळ व लांब आकाराचे असते. कान मध्यम व टोकदार असतात. शिंगे धारदार आणि टोकदार असतात. प्रौढ गायीचे वजन 315 किलो, तर प्रौढ नराचे वजन 500 किलोपर्यंत असते.

उत्पादन क्षमता

या गायीचे प्रथम माजावर येण्याचे वय 36 ते 72 महिने आहे. गायीचा दूध देण्याचा कालावधी 7 ते 10 महिन्यांचा असून एका वेतात 572 लिटरपर्यंत दूध देतात. दिवसाकाठी 4 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता या गायीत आहे.

या जातीमध्ये प्रचंड ताकद असते. विलक्षण चपळाई व कामामध्ये सातत्य असलेला या जातीच्या बैलांची ब्रिटीशांच्या काळात मिलेटरी बैल’ (Military Bull) म्हणून ओळख परिचित होती कारण सैन्याच्या तोफा वाहून नेणे, आरमाराचे अवजड सामान अडचणीचे जागी वाहून नेणे, लांब पल्ल्याची वाहतूक कमीत कमी वेळात करणे. इ. कामे हे बैल करत असत. सध्या बाजारात देशी गायीच्या दुधाची मागणी वाढत आहे. त्यामुळे जातिवंत दुधाळ गायीची निवड, योग्य पैदास धोरण आखून करणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!