Amul Dairy : अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण; देशातील 36 लाख शेतकऱ्यांशी जोडलीये नाळ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची दूध उत्पादक सहकारी संस्था असलेल्या ‘अमूल’ने (Amul Dairy) आपली 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज ‘अमूल’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावत देशातल्या अनेक भागांमध्ये पसरलेलया आणि जवळपास 18,600 गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमूल दूध उत्पादक संस्थेचे तोंड भरून कौतुक केले आहे. देशातील 36 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत जोडल्या गेलेल्या ‘अमूल’ या संस्थेला (Amul Dairy) त्यांनी ‘वटवृक्ष’ अशा शब्दात उपाधी दिली आहे.

‘शेतकऱ्यांचे मोठे योगदान’ (Amul Dairy Completes 50 Years)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 50 वर्षांपूर्वी ‘अमूल’च्या (Amul Dairy) रूपात एका वडाच्या झाडाचे रोपटे लावण्यात आले होते. जे रोपटे आज महाकाय वडाच्या झाडामध्ये रूपांतरित झाले आहे. यासर्वांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक दूध उत्पादक संस्था नावारूपाला आल्या. मात्र, अमूल सारखे यश कोणत्याही संस्थेला मिळवता आलेले नाही. अमूलने विश्वास, विकास, सक्रिय सहभाग आणि शेतकऱ्यांना सामावून घेत प्रगती साधली आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी या कार्यक्रमाला देशातील अमूलच्या 18,600 गावांमधील प्रतिनिधींनी हजेरी लावली होती.

दररोज 3.5 कोटी लिटर दूध संकलन

अमूल दूध उत्पादक संस्थेच्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला अमूलची दूध व दुग्धजन्य उत्पादने जगभरातील 50 देशांमध्ये निर्यात केली जात आहे. याशिवाय ३६ लाख शेतकऱ्यांना अमूलने आपल्यासोबत जोडले आहे. दररोज अमूलकडून 3.5 कोटी लिटर दूध संकलन केले जात आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना दररोज 200 कोटी रुपये त्यांच्या दुधासाठी वाटप केले जातात. तसेच अमूल दूध संस्थेच्या दूध उत्पादनात मागील दशकभरात 60 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. असेही संस्थेने म्हटले आहे.

error: Content is protected !!