Ancestral Land : वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करता येते का? ‘हा’ अधिकार वडिलांना आहे का? वाचा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वडिलोपार्जित जमीन (Ancestral Land) हा वर्षानुवर्षे चालत आलेला शेतकऱ्यांचा वारसा असतो. मात्र काही लोक समोरच्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन लोणी चाखत असतात. ते लोणी चाखण्यात इतके पटाईत असतात की, कधी कधी त्यांच्या या कृतीमुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. आज गावागावात अनेक कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे ही पिळवणूक सुरु आहे. त्यामुळे आज आपण कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीवर नातवाचा किती हक्क असतो? वडील त्याला वडिलोपार्जित जमिनीतून (Ancestral Land) बेदखल करू शकतात का? असा अधिकार वडिलांना आहे का? अशा सर्व प्रश्नांची कायदेशीर उत्तरे जाणून घेणार आहोत.

वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय? (Ancestral Land Fathers Right)

वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय तर आपल्या मागील तीन पिढ्यांपासून आपल्या कुटुंबाला मिळालेली जमीन होय. तुमच्या वडिलांनी स्वकमाईने खरेदी केलेली जमीन ही वडिलोपार्जित नसते. अशा जमिनीबाबत सर्वस्वी त्यांना अधिकार असतो. मात्र वडिलोपार्जित जमिनीवर कुटुंबातील सर्व सदस्यांचा अधिकार असतो. याच वडिलोपार्जित जमिनीवर आज गावागावात वाद विकोपाला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायदेशीररित्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्काबाबत माहिती असणे आवश्यक बनले आहे.

नातवाचा किती अधिकार असतो?

नातू हा जन्माला येताच त्याचा वडिलोपार्जित जमिनीवर हक्क निर्माण झालेला असतो. त्यामुळे नातवाला आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर त्याच क्षणी पूर्ण अधिकार प्राप्त झालेला असतो. मग त्याचे वडील जिवंत असोत किंवा नसो. नातवाला वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार मिळण्यासाठी वडील किंवा आजोबा यांच्या मृत्यूचा संबंध नसतो. कधी-कधी आजोबांना दोन मुले असतील आणि वडिलांचा मृत्यू झालेला असेल. तर अशावेळी चुलत्याकडून पुतण्याची (म्हणजेच नातवाची) फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या अधिकाराबाबत नातवाला माहिती असणे आवश्यक आहे

शेती संदर्भात अशीच नवनवीन कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असे सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची शेतीविषयक माहिती, दररोजचे बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहू शकता.

बेदखल करता येते का?

वडिलोपार्जित जमिनीवर (Ancestral Land) सर्व नातवांना अधिकार मिळालेला असतो. तुमचे वडील पंजोबांचे नातू असतात. तर तुम्ही तुमच्या आजोबांचे नातू असतात. त्यामुळे जमीन ही तीन पिढ्यांची असेल तर अशा जमिनीचे वारसदार हे कुटुंबातील सर्व नातू असतात. अशावेळी तुमचे वडील तुमचा वडिलोपार्जित जमिनीवरील हक्क कोणत्याही परिस्थितीत नाकारू शकत नाही. वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करण्याचा अधिकार वडिलांना कायद्याने नसतो. वडिलोपार्जित जमिनीवरील हक्कापासून कोणत्याही परिस्थितीत नातवाला वंचित ठेवले जाऊ शकत नाही.

हेही वाचा : वडिलोपार्जित जमीन वडिलांना विकता येते का? वाचा पुन्हा कशी मिळवाल! (https://hellokrushi.com/ancestral-land-can-sold-to-father-see-law/)

कधी-कधी वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर चुलत्याकडून पुतण्याला (म्हणजेच नातवाला) वडिलोपार्जित जमीन (Ancestral Land) देण्याबाबत टाळाटाळ केली जाऊ शकते. त्यामुळे अशावेळी तुम्ही वडिलोपार्जित जमीन मिळवण्यासाठी 12 वर्षांच्या आत रीतसर दावा दाखल करू शकतात. इतकेच नाही तर वडिलोपार्जित जमीन मिळवण्यासाठी दावा दाखल करण्यास विलंब झाला. तरीही विलंबाचे योग्य कारण तुम्ही न्यायालयासमोर समोर सादर केल्यास 12 वर्षांच्या अवधीनंतरही तुमचा दावा न्यायालय स्वीकारू शकते. याशिवाय वडिलोपार्जित जमीन विक्री केली जात असेल तर कोणत्याही क्षणी नातू कोर्टात धाव घेऊन अशी विक्री प्रतिबंधित करू शकतो.

(वडिलोपार्जित जमिनींचे नियमन करणारे कायदे किचकट असतात. त्यामुळे वडिलोपार्जित जमिनीवर दावा करण्यासाठी दिवाणी खटला दाखल करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या एखाद्या वकील मित्राचा किंवा कायदा क्षेत्राचा अभ्यास असलेल्या व्यक्तीचा सल्ला घेऊनच दावा दाखल करणे योग्य ठरते.)

error: Content is protected !!