Animal Diseases and Treatment: जनावरांना होणार्‍या प्राणघातक आजारांवर वेळीच करा उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पाळीव जनावरे निरनिराळ्या रोगांनी आजारी पडतात (Animal Diseases and Treatment). आजारी जनावराला प्रत्येक वेळी ताबडतोब पशु वैद्यकाची मदत मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत पशु पालकास जनावरांना होणारे सर्व सामान्य रोग व त्यावरील प्राथमिक उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास जनावरातील मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. जनावरांत सर्व साधारणपणे आढळणारे रोग व त्यावरील उपाय (Animal Diseases and Treatment) खालील प्रमाणे आहेत.

  1. हगवण: हगवणीचे प्रमाण नवजात वासरात जास्त आढळते. विशेषत:: म्हशीच्या वासरामध्ये हगवणीमुळे होणा-या मृत्युचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. ज्या वासरांना जन्मानंतर एका तासाच्या आत चीकाचे दूध मिळत नाही, अशी वासरे हगवणीमुळे दगावण्याची शक्यता जास्त असते,  हा रोग जीवाणूमुळे होतो. कुजलेले अन्न खाणे, घाणेरडे पाणी पिणे किंवा हिरवा चारा प्रमाणाबाहेर खाणे यामुळेही रोग होण्यास चालना मिळते. या रोगाने आजारी असलेले वासरु करडी (Animal Diseases and Treatment) पांढरी संडास करते. दूध पीत नाही, अशक्त होत जाते. त्याचे डोळे खोल जातात व शेवटी ते मृत्युमुखी पडतात.

उपाय: आजारी जनावराला इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. वासराला सल्फाडीमिडीन किंवा नेफ्टीनच्या 1 ते 2 गोळ्या तीन दिवस द्यावे. मोठ्या जनावराला खडूची पावडर 100 ग्रॅम, काथ 30 ग्रॅम व डिंक 15 ग्रॅम पाण्यात मिसळून पाजावे. वासराला ग्लुकोज, साखर किंवा इलेक्ट्रोलक्स पावडर पाण्यात मिसळून ते पाणी दिवसातून 5 ते 7 वेळेस पाजावे.

  • पोटफुगी: जनावराने हिरवे गवत प्रमाणाबाहेर खाल्यास किंवा जनावराच्या खाद्यात अचानक बदल केल्यास पोटफुगी उद्भवते.  या रोगामध्ये जनावराची डावी कूस नगा-यासारखी फुगते, ते बेचैन होते. खाणे व रवंथ करणे बंद करते, सारखे उठबैस करते व पोटावर लाथा मारते. वेळीच उपाय योजना न केल्यास श्वसन इंद्रियावर असहनीय दाब पडून जनावर प्राणवायु अभावी मृत्युमुखी पडते.

उपाय: मोठ्या जनावराला 30 ते 60 मि.ली. टर्पेन्टाईन तेल अर्धा लिटर गोडे तेलात मिसळून ते मिश्रण तोंडा वाटे हळूहळू पाजावे किंवा अर्धा लिटर गोडे तेल तोंडावाटे पाजावे.

  • स्तनदाह: या रोगात कास दगडासारखी टणक होते. त्यामुळे या रोगाला दगडी असेही म्हणतात.  कासेला सुज येऊन ती लाल होते. सडातील दूध अतिशय पातळ किंवा लालसर तर कधी पू-मिश्रीत येते. जनावर कासेला हात लावू देत नाही.

उपाय: ज्या सडातून खराब दूध येते त्या सडातील संपूर्ण दूध काढून टाकावे व त्या सडात प्रतिजैविकाची ट्यूब सोडावी, असे किमान 4 ते 5 दिवस करावे. दूध काढण्यापूर्वी कास सेव्हलॉनच्या द्रावणाने धुवून सडावर काही जखमा असल्यास त्यांची योग्य ती देखभाल करावी.

  • या: हा एक जीवाणू पासूनच होणारा रोग अचानक उदभवतो. वयाच्या दोन वर्षापर्यंतची जनावरे या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात. जनावराला खूप ताप येतो, ते लंगडू लागतात. त्यांचा खांदा किंवा पुठ्ठा सुजतो व तेथे दाबल्यास करकर असा आवाज येतो व जनावर 1 ते 2 दिवसात मृत्युमुखी पडते.

उपाय: या रोगावर तातडीने पशु वैद्याच्या सहायाने उपचार करणे आवश्यक आहे. प्रतिजैविकाची इंजेक्शन पशुवैदयकाच्या सल्ल्याने द्यावीत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांना लस टोचून घ्यावी.

  • घटसर्प: हा जीवाणूजन्य रोग आहे. घटसर्प झालेले जनावर अचानक आजारी पडते. खाणे पिणे बंद होऊन त्याला खूप ताप येतो. त्यांच्या जबड्याखाली सूज येते. जनावर लाळ गाळू लागते व त्याच्या घशातून घरघर असा आवाज येतो. त्याला श्वसनास त्रास होऊ लागतो व जनावर 1 ते 2 दिवसात मृत्युमुखी पडते.

उपाय: या रोगावर पशुवैदयकाकडुन तातडीने उपचार करुन घेणे आवश्यक आहे. सल्फा आणि टेट्रॉसायक्लीनची इंजेक्शने 4 ते 5 दिवस द्यावीत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांना लस टोचून घ्यावी.

हे सुद्धा वाचा: जनावरांच्या लाळ्या खुरकुत रोगावर करा ‘हा’ घरगुती उपचार

  • लाळया खुरकूत : हा एक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा अत्यंत त्वरेने फैलाव होतो. गावातील बहुसंख्य गाई – म्हशी व बैलांना (Animal Diseases and Treatment) एकाच वेळी रोगाची लागण झाल्याचे आढळून येते. या रोगात जनावरांच्या तोंडात व खूरात जखमा होतात व त्यामुळे जनावर चारा खाऊ शकत नाही. लाळ गाळते व लंगडते, त्याला ताप येतो व वेळीच औषधोपचार न केल्यास खूरात अळ्या पडतात.

उपाय : जनावरांच्या जखमांना बोराग्लिसरीन लावावे तर खूरातील जखम टर्पेन्टाईनने धुवून त्यावर जंतु नाशक मलम लावावे. पशुवैद्यकाच्या सहायाने 5 ते 6 दिवस प्रतिजैविकाची इंजेक्शने दयावीत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी गुरांचे गोठे सोडयाने किंवा फिनॉईलने धुवावेत. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासुन वेगळे ठेवावे. जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजू नये. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जनावराला या रोगावरील (Animal Diseases and Treatment) प्रतिबंधात्मक लस टोचावी.

हे सुद्धा वाचा:  ‘या’ पद्धतीने करा शेळ्यांचे लसीकरण, रोगांपासून राहतील दूर

error: Content is protected !!