Fodder Management in Summer: उन्हाळ्यात करा जनावरांच्या चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन; वाढवा पौष्टिक गुणधर्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना आवश्यक अशा चारा (Fodder Management in Summer) आणि पाणी टंचाई फेब्रुवारी महिन्यातच जाणवायला लागली आहे. ज्या शेतकर्‍यांनी जनावरांसाठी हिरवा चारा मुरघास (Murghas) स्वरुपात साठवून ठेवला असेल त्यांना कदाचित या समस्या येणार नाहीत. परंतु अजूनही बहुतेक पशुपालक शेतकरी चारा निर्मितीला पाहिजे तेवढे महत्व देत नाही, त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना मोठ्या समस्येला सामोरा जावे लागते.  

शेतकरी पिकांचे धान्य काढल्यानंतर राहिलेले अवशेष जनावरांचा चारा म्हणून वापरतात. कडबा, सोयाबीन भुसकट किंवा गुळी, गव्हाचं काड, भाताचा पेंडा, उसाच वाळलेलं पाचट यासारख्या वाळल्या चाऱ्याचा निकृष्ट चाऱ्यामध्ये समावेश होतो. या वाळलेल्या चाऱ्यामध्ये पौष्टिक घटक कमी प्रमाणात असतात. आजच्या लेखात आपण जाणून घेऊ या उन्हाळ्यात जनावरांचा चारा (Fodder Management in Summer) कसा पौष्टिक करावा. 

जनावरांसाठी पौष्टिक चारा (Fodder Management in Summer)

  • चाऱ्याची कमतरता असल्यास जनावरांच्या खाद्यामध्ये कडुनिंब, अंजन, वड, पिंपळ, शेवरी इत्यादी झाडांची ओली पाने, हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, उसाचे वाढे यांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
  • जनावराला निकृष्ट चाऱ्यासोबत गूळ, मळी, मका, भरड यासारखे तात्काळ ऊर्जापुरवठा करणारे पदार्थ द्यावेत. यामुळे जनावरांच्या कोटीपोटातील जीवाणूंची संख्या आणि त्यांची क्रियाशिलता वाढून निकृष्ट चाऱ्याचे योग्य प्रकारे पचन होते.  
  • वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे, यामुळे जनावरे अधिक आवडीने चारा खातात.
  • चारा टंचाईकाळात किंवा ज्या ज्या वेळी वाळलेल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर होत असेल, त्या वेळी जनावरांना योग्य मात्रेत नत्र व सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावं.
  • उसाची कुट्टी करून ती जनावरांना चारा म्हणून द्यावी. उसाच्या वाढयावर प्रक्रिया करून ते जनावरांना द्यावेत.
  • कमी वेळात जास्त वाढ होणार्‍या अझोलाचा वापरही जनावरांच्या पशुखाद्यात करता येऊ शकतो.
  • कडबा, भुसा यावर प्रक्रिया करून त्यांचे पोषणमुल्ये वाढवून यांचा वापर जनावरांच्या आहारात करावा.
  • चारा टंचाईच्या काळात जनावरांना शेळ्या-मेंढ्यांना अंजन, सुबाभुळ, कडुलिंब या झाडांचा पाला देता येऊ शकतो.
  • जनावरांच्या आहारात नियमितपणे 30 ग्रॅम खनिज मिश्रणांचा समावेश करावा.
  • हिरव्या चाऱ्याच्या (Fodder Management in Summer) अभावामुळे जनावरांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ ची कमतरता दिसून येते. यामुळे  डोळ्यातून नियमित पाणी येणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, सतत हगवण लागणं, डोळ्याचा पडदा पांढरा होणं, अंध वासरं जन्मणे अशा समस्या निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी दर पंधरा दिवसांतून एकदा ‘अ’ जीवनसत्त्व युक्त द्रावण तोंडावाटे द्यावे किंवा जीवनसत्त्व ‘अ’ चे  इंजेक्‍शन द्यावे.
error: Content is protected !!