Animal Husbandary : पशूसंवर्धन विभागाच्या ‘या’ योजनांसाठी उरलेत दोन दिवस; तत्काळ करा अर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Animal Husbandary) राबविल्या जातात. यात प्रामुख्याने राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून त्या राबविल्या जातात. या योजनांसाठी राज्यात सरकारकडून 15 डिसेंबरपर्यंतची मुदत, अर्ज करण्यासाठी देण्यात आली आहे. अधिकाधिक दुग्धउत्पादक शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या योजनांचा (Animal Husbandary) लाभ घ्यावा, असे राज्य सरकाकडून सांगण्यात आले आहे.

15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ (Animal Husbandary Schemes For Farmers)

राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना चालू वर्षात राबविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज स्वीकारणे व जुन्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करून निवड पूर्ण करणे व जिल्हास्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करण्याची मुदत 8 डिसेंबर रोजी संपुष्टात आली होती. मात्र क्षेत्रीय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणात सुरू असलेल्या वंध्यत्व निवारण शिबिरादरम्यान विविध जिल्ह्यांतून मुदतवाढ देण्याबाबत पशुसंवर्धन आयुक्तांकडे विचारणा होत होती. त्यानुसार जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज करता यावे. यासाठी 2023-24 या वर्षासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राजस्तरीय योजना

  • राज्य सरकारच्या या योजनांमध्ये राजस्तरीय योजना दुधाळ गाय/म्हशींचे वाटप, शेळी मेंढी गट वाटप, 100 पक्ष्यांच्या माध्यमातून कुकुटपालन यांसारख्या योजनांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय योजना

  • जिल्हास्तरीय योजनांमध्ये शेळी मेंढी गट वाटप करणे (योजनेचे नाव -जिल्हास्तरीय 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे).
  • दुधाळ गाय/म्हशींचे वाटप (योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना वाटप करणे)
  • तलंगा गट वाटप करणे (योजनेचे नाव -8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करणे)
  • एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करणे (योजनेचे नाव -एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे)

(अधिक माहितीसाठी राज्य सरकारच्या https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळास भेट द्यावी)

error: Content is protected !!