Animal Husbandry : सरकारची भन्नाट योजना! पशुधन खरेदीसाठी मिळेल फक्त 4 टक्के व्याजाने कर्ज; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal Husbandry : सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा पशुपालन व्यवसायाकडे वळलेला दिसत आहे. तरुण वर्ग तर नोकरी पेक्षा पशुपालन व्यवसाय करण्यास जास्त प्राधान्य देत आहे. पशुपालन व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार अनेक योजना राबवत असते. या योजनांचा लाभ देखील पशुपालकांना होत असतो. दरम्यान, सध्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पशुपालनाबाबत नवी एक योजना आणली आहे.

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

सरकारने सध्या ‘पशु किसान क्रेडिट कार्ड’ ही योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना गाई-म्हशींवर कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर शेळीपालन किंवा कुक्कुटपालनासाठी बँकेकडून कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या योजनेद्वारे पशुपालकांना गाई खरेदीसाठी ४० हजार रुपयांचे तर म्हशीसाठी ६० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते. (Animal Husbandry)

या भन्नाट योजनेचा अनेक पशुपालक लाभ घेत आहेत. या योजनेत तुम्हाला १ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज मिळते. ज्याचे व्याज फक्त ४ टक्के आहे. त्यामुळे याचा चांगला फायदा होतो. महत्वाचं म्हणजे पशुपालकांना हे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते. त्यामुळे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊन जनावरांची खरेदी करू शकता.

पशूंची विक्री कशी करणार?

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरी बसल्या देखील पशूंची विक्री करू शकतात. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन आमचं Hello krushi च अँप डाउनलोड करावे लागेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या पशूंची विक्री घरी बसल्या करता येईल त्याचबरोबर बाजारभाव, सरकारी योजना या गोष्टींची माहिती देखील तुम्हाला लेगच मिळेल. त्यामुळे कसलाच विचार न करता प्लेस्टोअरवर जा आणि आपले Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर बँकेकडे अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, मोबाईल नंबर तसेच प्राणी आरोग्य प्रमाणपत्र, पशु विमा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

error: Content is protected !!