Animal Husbandry Business : पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त 4 टक्के व्याजाने कर्ज; ‘या’ पद्धतीने करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal husbandry business : सध्या बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करण्याचा विचार करतात. मात्र सर्वजणांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेकजण हा व्यवसाय करू शकत नाही. गाई म्हशींची किंमत जास्त असल्यामुळे अनेक जण गाई म्हशी खरेदी करू शकत नाही, मात्र आता शेतकऱ्यांसाठी सरकारने पशुपालना बाबत एक नवीन योजना आणली आहे, त्यामुळे या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार आहे.

सरकारने नेमकी कोणती योजना आणली?

पशुपालकांचा विचार करून सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना गाई आणि म्हशीवर कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर शेळी पालन किंवा कुक्कुटपालन यासाठी बँकेकडून कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पशुपालन करण्यासाठी जास्त अडचणी येणार नाहीत. या योजनेमध्ये तुम्हाला जवळपास एक लाख 80 हजार रुपयांचे कर्ज फक्त चार टक्के व्याजावर दिले जाणार आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेऊन अनेक शेतकरी बांधव जनावरे खरेदी करू शकतात.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. या अर्जासाठी तुम्हाला त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रे देखील जोडावे लागतात. (Animal husbandry business)

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट साईट फोटो
  • पशु विमा प्रमाणपत्र
  • प्राणी आरोग्य प्रमाणपत्र
  • त्याचबरोबर बँक तुमचा क्रेडिट स्कोर तपासून कर्ज ठरवू शकते .

घरबसल्या करता येणार पशूंची खरेदी विक्री

शेतकऱ्यांनो जर तुम्ही पशूंची विक्री किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला ते घरबसल्या करता येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल घरबसल्या नेमकी कशी करायची खरेदी विक्री? तर यासाठी तुम्हाला एक सोपं काम करायचा आहे. प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल करायचे आहे. हे ॲप इंस्टाल केल्यानंतर त्या ठिकाणी पशूंची खरेदी विक्री असा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक करून जर तुम्हाला तुमच्या पशूंची विक्री करायची असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पशूंचा फोटो आणि किंमत कटाकायची यानंतर ज्या कोणाला तुमच्या पशुंची खरेदी करायचे आहे ते तुम्हाला संपर्क साधतील. यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर देखील टाकावा लागेल. त्यामुळे लगेचच Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा.

error: Content is protected !!