गाय म्हैस गाभण राहत नसतील तर करा ‘हा’ घरगुती उपाय; 100% राहणार गाभण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal husbandry business : सध्या आपल्याकडे सर्वजण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसत आहेत. मात्र पशुपालन हा व्यवसाय करत असताना पशुपालकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे गाई म्हैस गाभण न राहणे ही सर्वात मोठी पशुपालकांची समस्या असते. यामुळे बऱ्याचदा पशुपालन हा व्यवसाय परवडत नसल्याचे देखील पशुपालक बोलतात मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची गाई म्हैस 100% गाभण राहील त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

गाय म्हैस गाभण राहण्यासाठी करा ‘हा’ देशी उपाय

जर तुमची गाय म्हैस गाभण राहत नसेल तर तुम्हाला एक घरगुती देशी उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील होणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला बाजारात जाऊन हळकुंड आणावे लागेल यानंतर या हळकुंडाची बुकटी करायचे आहे. साधारणपणे दीडशे ग्रॅम पावडर होईल एवढे हळकुंड बाजारातून आणायचे आहेत. याचा डोस जनावरांना सात दिवस पुरेल एवढा असेल. पहिल्या टप्प्यातील डोस रोज 20 ग्रॅम जनावराला द्यायचा आहे. चालतर मग जाणून घेऊया कसा बनवायचा हा डोस.

या ठिकाणाहून करा पशूंची खरेदी विक्री –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या पशूंची खरेदी विक्री करायची असेल तर आता हे काम खूप सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या देखील तुमच्या पशूंची खरेदी विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटे काम करायचे आहे. तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टाल करायचे आहे. हे ॲप इंस्टाल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या पशूंचा फोटो टाकून त्यांची माहिती देऊन त्या ठिकाणाहून पशूंची खरेदी विक्री करू शकता. ही सर्व प्रक्रिया अगदी मोफत आहे त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जाऊन आपले हे अँप इंस्टाल करा.

शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला थोडे गव्हाचे पीठ घ्यावे लागेल ते तुपामध्ये भाजायचे आहे यामध्ये गूळ किंवा साखर मिक्स करायचे आहे. यानंतर तुम्हाला पूर्ण गव्हाच्या पिठाचा हलवा तयार करायचा आहे. आणि हा हलवा तयार झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 20 ग्रॅम हळद टाकायची आहे एका दिवसासाठी आपण 20 ग्रॅम हळद बनवलेली आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. त्यानंतर हे मिश्रण जनावरांना खाऊ घालावे.

जनावरांना मिश्रण द्यायची वेळ नेमकी कोणती?

प्रत्येक गोष्टीला काही ना काही वेळ असते. आपण आपल्याला गोळ्या खायच्या म्हटल्या तरी आपण त्या वेळेवर खातो. तसेच जनावरांना देखील औषधे द्यायची म्हटली तरी वेळेवर देणे गरजेचे असते त्यामुळे हे तुम्ही बनवलेले मिश्रण जनावरांना त्यांचं खाऊन झाल्यावर देणे गरजेचे आहे. शक्यतो हे मिश्रण संध्याकाळी आठ ते नऊच्या सुमारास देणे गरजेचे आहे.

हे मिश्रण जनावरांना किती दिवस द्यावे?

पहिल्या टप्प्यातील हे मिश्रण जनावरांना सात दिवस देणे गरजेचे असते. सात दिवस दिल्यानंतरच याचा फरक तुम्हाला जाणवेल. जर तुम्ही एक आणि दोन दिवस देऊन हे जर बंद केले तर तुम्हाला यापासून काही फरक जाणवणार नाही त्यामुळे सात दिवसाचा कोर्स कम्प्लीट करणे गरजेचे असते. हे मिश्रण जनावरांना दिल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे चारा आणि पाणी द्यायचे नाही. या मिश्रणाने तुमच्या गाय किंवा म्हशीच्या गर्भाशयामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम दूर होऊन जातील. काही जखमा असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील सर्व प्रॉब्लेम या मिश्रणामुळे दूर होतील.

गायी म्हशींची लागवड केल्यानंतर त्या परत दुसऱ्यांदा हिट वरती येतात अशावेळी काय करावे? जाणून घ्या

बऱ्याचदा आपल्या जनावराची एकदा लागवड झाल्यानंतर ते परत रिपीट होते. मात्र त्यासाठी एक वनस्पती फायद्याची ठरत आहे त्या वनस्पतीचे नाव आहे सदाहरि वनस्पती. त्याचबरोबर याला दगडीपाला, कंबरमोडी अशी वेगवेगळी नावे या वनस्पतीचे आहेत. तुम्हाला ही वनस्पती रानातून घरी नेऊन स्वच्छ पाण्याने धुवायची आहे. या धुतल्यानंतर ज्या जनावरांना याची गरज आहे त्या जनावरांना 500 ग्रॅम या खाऊ घालायचे आहेत. यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने त्यांना खाऊ घालू शकता. जर तुम्ही कुटी करत असाल तर त्या कुटीमध्ये हे मिसळून खाऊ घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या हाताने देखील जनावरांनाही खाऊ घालू शकता असे केल्यास तुमचे जनावर जनावर परत रिपीट होणार नाही.

error: Content is protected !!