Animal Husbandry Business : ‘ही’ गाय करेल तुम्हाला श्रीमंत, देते सर्वात जास्त दूध; जाणून घ्या खासियत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal Husbandry Business : सध्या अनेकजण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसतात मात्र पशुपालन व्यवसाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईंची निवड असते. जर आपण गाईंची योग्य निवड केली तर आपल्याला चांगला नफा मिळतो. त्याचं कारण असं की जर योग्य गाईची निवड केली तर ती दूध देखील चांगले देते त्यामुळे आपल्याला याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे पशुपालन करताना गाईंची निवड करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला माळवी या गाईंबद्दल सांगणार आहोत. माळवी ही भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गाईंच्या जाती पैकी एक आहे.

जनावरांची थेट शेतकरी ते शेतकरी खरेदी विक्री करण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

माळवी या गाईचे मूळ मध्यप्रदेशातील माळवा पठारी प्रदेशातील असल्याचे मानले जाते. ही गाय दुधाला चांगली असल्याचे देखील बोलले जाते. या गाईला महादेवपुरी आणि मंथनी या नावाने देखील ओळखले जाते. दिसण्याचे वर्णन केले तर ही गाय दिसायला इतर काहींपेक्षा सुंदर मोठी आणि सुडोल आहे.

माळवी गाय नेमकं किती दूध देते?

माळवी गाय ही इतर गाईंच्या तुलनेने दीडपट जास्त दूध देते. ही गाय दररोज 12 ते 15 लिटर दूध देते. फक्त गाई दूध जास्त देत नाही तर या गाईच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण देखील इतर गाईंच्या तुलनेमध्ये जास्त आहे. त्यामुळे जर फॅट जास्त लागली तर तुम्हाला दुधाला दरही चांगला मिळे. या गाईच्या किमती बद्दल जर पाहिली तर ही गाई तुम्हाला 20 ते 50 हजार रुपयांमध्ये मिळते.

या जातीची वैशिष्ट्ये काय?

या गाई साधारणपणे पांढऱ्या तपकिरी रंगाच्या असतात. त्याचबरोबर मान, खांदे आणि कुबड्याचा रंग तपकिरी काळा असतो. या गाईंचे डोके लहान असून डोळ्यांभोवतीचे केस काळे असतात. त्यांचे पाय देखील लहान असतात मात्र पाय मजबूत असतात. त्याचबरोबर या गाईंच्या शिंगाबद्दल पाहिले तर या गाईंची शिंगे मोठी असतात. या गाईचे वजन सरासरी 350 किलो पर्यंत असते. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गाई खडबडीत रस्त्यांवरून जास्त ओझे वाहून नेण्यास सक्षम आहे.
गाईंची खरेदी विक्री कुठे करणार

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर गाय खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर आता बाजारामध्ये जायची गरज नाही. मात्र तुम्हाला फक्त एक सोपी गोष्ट करायची आहे. तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचे आहे. हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ॲप ओपन करून पशुंची खरेदी विक्री हा ऑप्शन सिलेक्ट करून तिथे तुमच्या गायीचा फोटो टाकून तिची किंमत टाकू शकता. यामुळे ज्या कोणाला तुमची काही खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील त्यामुळे तुम्हाला बाजारात जायची गरज भासणार नाही.

माळवी जातीच्या गाय कुठे आढळतात

माळवी जातीच्या गाई ह्या पश्चिम मध्य प्रदेशातील माळवा पठारा व्यतिरिक्त शहापूर, देवास, इंदूर, उज्जैन इत्यादी जिल्ह्यांमध्ये या गाई आढळतात. हैदराबादमध्ये देखील या गाई पाळल्या जातात.

error: Content is protected !!