Animal husbandry business : अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. कारण केवळ शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. सर्वात आनंदाची बाब म्हणजे सरकारकडून आता पशुपालनसाठी अनुदानही दिले जात आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. जर तुम्ही पशुपालन करत असाल तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. अनेक शेतकरी बियाणांच्या पाकिटामध्ये असणारे बुरशीनाशक असेच बांधावर फेकून देतात. जर ते जनावरांच्या पोटात गेले तर मोठी समस्या निर्माण होते. परंतु तुम्ही त्यावर वेळीच उपाय योजना केली तर तुम्हाला नुकसान टाळता येईल.
जनावरांची थेट शेतकरी ते शेतकरी खरेदी विक्री करण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा
आजच करा हे काम
- आजच तुमच्या जनावरांचे मान्सून पूर्व लसीकरण म्हणजे घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या.
- त्यांना जंतनाशक औषध पाजा जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील.
- गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
- तुमच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असेल तर त्या ठिकाणी जनावरांना चरायला सोडू नका.
- गोठ्यातील विद्युत उपकरणे सुरक्षित आहेत का याची खात्री करा.
- दररोज संध्याकाळी कडुलिंबाच्या पानांचा धूर करावा, यामुळे गोठ्यात डास राहणार नाहीत.
- तसेच जनावरांना स्वच्छ पाणी पिण्यास द्या.
चुकूनही करू नका ही चूक
- औषध फवारणीनंतर त्या ठिकाणी जनावरांना चरायला सोडू नका.
- पेरणीनंतर बियाण्याच्या पाकिटांमधील बुरशीनाशक पाकिटे उघड्यावर फेकून देऊ नये.
- हळदीमधील कोवळे नीळ फुली गवत जनावरांना चुकूनही खायला देऊ नका.
- आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा.
- जनावरांना विजेच्या खांबाला बांधणे टाळावे.