Animal Husbandry : गाईचे पालन केल्यास मिळणार महिना 900 रुपये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायात पशुपालनात गायींना अधिक महत्त्व असते. तिला गोमातेचा दर्जा दिला जात असून हल्ली गायींचे संवर्धन करणाऱ्यांची संख्या ही कमी झालेली आहे. यामुळे आता गाईंचे संवर्धन व्हावे यासाठी मध्य प्रदेश सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी गायीचे संवर्धन करतील आणि सेंद्रिय शेती करतील त्यांना दरमहा ९०० रुपये देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

एवढंच नाही तर आतापर्यंत आपण आजारी लोकांसाठी रुग्णवाहिका पहिली असेल. मात्र आता मध्यप्रदेश सरकारने देखील जनावरांसाठी रुग्णवाहिका आणि मोफत शेणखतांचे वाटप केले आहे. राज्यभरात अनेक गोवर्धन प्लांट उभारून ते शेणापासून सीएनजी बनवणार आहेत.

जे शेतकरी गायींचे संगोपन करतील आणि सेंद्रिय शेती करतील त्यांना महिन्याला ९०० रुपये देण्यात येणार आहे. हा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेश सरकारने २२००० शेतकऱ्यांना पहिला हप्ताही जारी केला आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

गाईचे आणि हिंदू धर्माचे वैशिष्ट:

हिंदू धर्मात गाईला आई मानतात. म्हणजे गोमाता म्हणून संबोधलं जातं. यामुळे हिंदू धर्मात गाईला देवाचं स्थान आहे. ज्यावेळी गाईचे संवर्धन किंवा पालन होत नव्हते. यासाठी मध्यप्रदेशने दरमहा ९०० रुपये गाईचे पालन आणि सेंद्रिय खताची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. तसेच कोणत्याही शुभ कार्यात गाईचे गोमूत्र वापरले जाते. तसेच शेणाचा देखील वापर केला जातो. हे एक हिंदू धर्माचे आणि गाईचे वैशिष्ट आहे.

error: Content is protected !!