Animal Husbandry : …कसा होतो जनावरांना लाळ्या खुरकूत रोग? ज्याची अर्थसंकल्पात झाली चर्चा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गाय, म्हैस या दुधाळ प्राण्यांसह अन्य पाळीव प्राण्यांना (Animal Husbandry) होणाऱ्या एफएमडी म्हणजेच लाळ्या खुरकूत आजाराच्या लसीकरणाने देशभरात सध्या जोर पकडला आहे. या आजारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनात घट होऊन, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुधाळ जनावरांना होणाऱ्या या आजारावर अर्थसंकल्पीय भाषणात चर्चा केली आहे. अर्थात केंद्र सरकारकडून या जनावरांच्या (Animal Husbandry) आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे धोरण अधोरेखित होते.

डेअरी उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम (Animal Husbandry In India)

विशेष म्हणजे देशातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन (Animal Husbandry) अधिक असूनही, बाहेरील देशांकडून प्रामुख्याने युरोपीय देशांकडून भारतीय डेअरी प्रॉडक्ट्सला मागणी ही खूपच कमी असते. यामागील प्रमुख कारण हे लाळ्या खुरकूत आणि घटसर्प या आजाराचा प्रादुर्भाव भारतीय जनावरांमध्ये अधिक असल्याचे आढळून येते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या आजारांवरील लसीकरणाची प्रक्रिया राबविण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. दुधाळ जनावरांना होणाऱ्या या आजारांचा समूळ नायनाट करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. ज्यामुळे गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनासह भारताला गुणवत्तापूर्ण मांस निर्यात करणे शक्य होणार आहे.

कसा होतो लाळ्या खुरकूत रोग?

पशुचिकित्सकांच्या माहितीनुसार, दूषित पाणी आणि दूषित चारा खाल्ल्याने जनावरांना लाळ्या खुरकूत आजार होत असतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या आजाराचा फैलाव हा अधिक प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात हिरवाईमुळे मोकळ्या रानात चरायला गेल्यानंतर काही ठिकाणी दूषित पाणी पिल्यास किंवा पावसाने सडलेला चारा खाल्ल्यास जनावरांना हा आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय एखाद्या जनावराला आधीपासून लाळ्या खुरकूत रोग हा आजार झालेला असल्यास अशा जनावराच्या संपर्कात येऊनही, अन्य जनावरांना हा आजार उद्भवतो.

कसा करावा त्यावर उपाय?

लाळ्या खुरकूत रोगाच्या उपचाऱ्यासाठी शेतकऱ्यांना (Animal Husbandry) कोणताही खर्च येत नाही. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय विभागात संबंधित जनावराचे इअर टॅगिंग करावे लागते. अर्थात सरकारच्या पशुवैद्यकीय विभागाकडे तुमच्या जनावराची नोंदणी होते. त्यांनतर तुम्ही संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या जनावराला झालेल्या लाळ्या खुरकूत रोगाची माहिती दिल्यास ते त्यावर निशुल्क लस टोचतात. या लसीमुळे १० ते १५ दिवसांमध्ये संबधित गाय किंवा म्हैस यांची संबंधित आजाराला प्रतिकार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे पावसाळयाच्या काळात आपल्या जनावरांना स्वच्छ पाणी आणि चारा देणे गरजेचे असते.

error: Content is protected !!