धक्कादायक! विषारी वैरण खाऊन 4 गायींचा मृत्यू, अज्ञातांनी फवारले होते विषारी औषध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : आपल्याकडे बरेच शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करतात. मात्र पशुपालन व्यवसाय करत असताना पशूंची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. जर पशूंची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला मोठा तोटा सहन करावा लागतो. सध्या पशूंबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

कागल परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कागल येथील साके या गावात काही अज्ञातांनी शेतात असणाऱ्या वैरणीवर विषारी औषध फवारले होते. आणि हेच गायींनी खाल्ल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तानाजी गवसे व सुवर्णा गवसे या शेतकरी कुंटुंबाने त्यांच्या गायींना जीवापाड जपले होते. मात्र गायींचा मृत्यू झाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. याबाबत आता चौकशी करण्याची मागणी देखील केली जात आहे. गवसे यांना औषध फवारणी केल्याची कल्पना नव्हती त्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे गायींना वैरण खाऊ घातली. गायींनी वैरण खाल्ल्यानंतर तासाभराने चारही गायी तडफडू लागल्या. यानंतर त्यांनी डॉक्टरांनाही बोलावले मात्र उपचारादरम्यान या गायींचा मृत्यू झाला.

error: Content is protected !!