Animal Husbandry : ‘या’ पद्धतीने करा शेळ्यांचे लसीकरण, रोगांपासून राहतील दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal Husbandry : शेळ्यांमध्ये खासकरून पावसाळ्यामध्ये विविध आजार दिसून येतात. त्यामुळे शेळीपालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेळ्यांच्या पुष्कळशा आजारांची लक्षणे ही सारखीच दिसतात. बऱ्याच वेळा आजारांचे योग्य निदान होण्याअगोदर शेळ्या दगावतात व इतर जवळपासची जनावरे ही संसर्गाने आजारी पडतात. त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले म्हणून शेळ्यांना योग्य वेळी रोगप्रतिबंधक लस, जंतनाशक औषध द्यावीत. तसेच शेळ्यांना गोचीड व पिसवा यापासून त्रास होऊ नये म्हणून डेल्टामेथ्रीन हे रसायन असलेले द्रावण गोठ्यात व शेळ्यांच्या अंगावर फवारावे.

शेळ्यांचे लसीकरण व जंतनाशक कार्यक्रम
अ.क्र. रोगाचे नाव पहिले लसीकरण नियमित लसीकरण
1 सी.सी.पी.पी. तीन महिने दरवर्षी (जानेवारी)
2 फाशी (काळपुळी) सहा महिने आणि त्यावरील दरवर्षी (फेब्रुवारी) रोगग्रस्त भागात
3 पी.पी.आर. तीन महिने आणि त्यावरील प्रत्येक 3 वर्षाला (फेब्रुवारी)
4 घटसर्प सहा महिने आणि त्यावरील दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला (एप्रिल)
5 आंत्रविषार चार महिने आणि त्यावरील- जर आईला लसीकरण केले असेल तर
पहिला आठवडा- जर आईला लसीकरण केले नसेल तर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (मे)
बुस्टर डोस- लसीकरण केल्यानंतर 15 दिवसांनी
6 फऱ्या सहा महिने आणि त्यावरील दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला (जून)
7 लाळ्या- खुरकूत चार महिने आणि त्यावरील वर्षातून दोनदा (सप्टेबर आणि मार्च)
8 शेळ्यातील देवी तीन महिने दरवर्षी (डिसेंबर)
• कुठल्याही दोन लसीकरणामध्ये 15 दिवसाचे अंतर असावे.

error: Content is protected !!