Animal Husbandry : पशुपालकांनो ‘या’ 2 प्रकारे करता येते नवजात वासरांचे संगोपन, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal Husbandry : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणावर या देशात शेती केली जाते. तसेच शेतीसोबत अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. याच पशुपालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पशुपालकांनी जर जन्मलेल्या वासराचे नीट संगोपन केले नाही, तर ते वासरू दगावण्याची शक्यता असते. पशुपालकांना वासराचे संगोपन दोन पद्धतीने करता येते. एक म्हणजे मातृत्व पद्धत आणि दुसरी म्हणजे दाई पद्धत. (Agriculture News)

१. मातृत्व पद्धत

या पद्धतीमध्ये नवजात वासराला जन्मल्यापासून गाईचे दूध काढण्याच्या वेळी वासरू सोडतात. असे केल्याने गाय पान्हा सोडते. थोडावेळ गाईचे दूध वासराला पिऊन दिल्यानंतर वासराला बाजूला करून दूध काढतात. त्यानंतर परत वासराला दूध पाजतात. अनेकदा वासरांसाठी एका सडातील दूध ठेवले जाते. परंतु असे केल्याने स्वच्छ दूध उत्पादनात अडथळा निर्माण होतो. मात्र वासरू निरोगी राहते. (Latest Marathi News)

२. दाई पद्धत-

दाई पद्धतीत वासराला जन्मल्यापासूनच गायी आणि म्हशी पासून वेगळे केले जाते. त्याला बाटलीने दूध पाजले जाते. त्यामुळे वासराला गरजेनुसार दूध पाजता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुधाची निर्मिती स्वच्छ होते. वासरा शिवाय गाई दूध देतात. त्यामुळे ही पद्धत परवडणारी आहे. हे लक्षात ठेवा की दुध पाजताना दुधाचे तापमान वासराच्या शरीरा इतके ठेवून पाजावे. त्याचबरोबर दूध पाजून झाल्यानंतर की लगेच ते भांडे गरम पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करा. या पद्धतीचा वापर केल्याने वासरांना कोणतेही आजार होत नाहीत.

error: Content is protected !!