Animal Husbandry : उस्मानाबादी शेळीसाठी पुण्यात बीज केंद्र; शेतकऱ्यांना जातिवंत शेळ्या मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Animal Husbandry) बातमी आहे. बरेली स्थित भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आयव्हीआरआयने एकूण पाच राज्यांमध्ये पशु बीज (सीमेन) केंद्र उभारले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील एक केंद्र उभारले जाणार आहे. पुणे येथील या केंद्रामध्ये प्रामुख्याने उस्मानाबादी शेळीच्या बीज (सीमेन) निर्मितीसाठी काम केले जाणार आहे. परिणामी, राज्यातील शेतकऱ्यांना उस्मानाबादी शेळीच्या पालनासाठी जातिवंत शेळ्या (Animal Husbandry) मिळण्यास मदत होणार आहे.

जातिवंत प्रजाती मिळण्यास मदत होणार (Animal Husbandry Five Seed Centre In India)

बरेली स्थित केंद्रीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयव्हीआरआय) संचालक डॉ. त्रिवेणी दत्त यांनी म्हटले आहे की, आयव्हीआरआयकडून देशातील पशुधनाच्या वाढीसाठी लवकरच पाच राज्यांमध्ये पशु बीज (सीमेन) केंद्र (Animal Husbandry) उभारली जाणार आहे. यामध्ये उत्तरप्रदेशातील बरेली येथे साहिवाल गाय आणि रोहिलखंडी शेळी साठीचे बीज केंद्र, उत्तराखंड राज्यातील नैनीताल जिल्ह्यात मुक्तेश्वर येथे चौगरखा शेळीचे बीज केंद्र, महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी उस्मानाबादी शेळी साठीचे बीज केंद्र उभारले आहे. याशिवाय अन्य दोन ठिकाणी पशु बीज केंद्र उभारले जाणार आहे. ज्यामुळे जातिवंत वंश निर्माण होण्यास मदत होणार आहे.

तीन एफपीओ स्थापन होणार

याशिवाय देशातील पशुपालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्यासाठी तीन शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आयव्हीआरआयमार्फत स्थापन केल्या जाणार आहे. या तीन शेतकरी उत्पादक संस्था प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये स्थापन केल्या जाणार आहे. याशिवाय या राज्यांमध्ये पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी डाटा बँक उभारली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अलीकडेच केंद्रीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेची 2024-25 या आर्थिक वर्षासाठीची व्हिजन बैठक पार पडली. त्यात हे दोन्ही निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जातिवंत शेळ्या आणि साहिवाल गाय मिळण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!