Animal Husbandry : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, नाशिक येथे पशुसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिकसह आसपासच्या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Animal Husbandry) सुवर्णसंधी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व इंडियन सोसायटी ऑफ व्हेटरीनरी सर्जरी यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी असून, पशूंची काळजी हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे ही कार्यशाळा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यासांठी (Animal Husbandry ) अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

पशुपालकांच्या अडचणींवर चर्चा (Animal Husbandry Technical Workshop)

मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेसाठी नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यांतील पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध पशु-औषधे व पशुखाद्य कंपन्यांचे तज्ज्ञ तसेच भारतातील विविध पशुविज्ञान विद्यापीठांमधील 300 पेक्षा अधिक तांत्रिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पशुसंवर्धन क्षेत्रातील संशोधन, त्यातुन पशुंचे आरोग्य व उत्पादनवाढीला मिळणारी चालना, या बदलांची प्रत्यक्ष पशुपालकांसाठी उपयुक्तता तसेच पशुधन व पशुपालकांच्या विविध अडचणी व त्यावरील उपाययोजना या विषयांवर सदर कार्यशाळेत उहापोह होणार आहे.

भविष्यातील संधींबाबत फायदा होणार

दरम्यान, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मोफत ब्रुसेल्ला चाचण्या करण्यासाठी शिबिराचेही आयोजन यादरम्यान करण्यात आले आहे. पशुसंवर्धन क्षेत्रातील उत्पादनवाढ, भविष्यातील पशुधन व्यवस्थापनातील संधी व वाव तसेच सक्षम व्यवसाय वाढीसाठी सदर कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय पशुवैद्यकशास्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र शर्मा यांच्या हस्ते होणार असुन, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे असणार आहे. असे विद्यापीठाने म्हटले आहे.

error: Content is protected !!