आपल्या देशात शेतीसोबतच पशुपालनाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून उत्पन्न वाढवत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पशुपालनासाठी गाई-म्हशींच्या नवीन जातींच्या संगोपनावर भर दिला जात आहे. जास्त दूध देणाऱ्या गाई आणि म्हशीच्या अशा अनेक जाती आहेत. या जाती डेअरी उद्योगासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला अधिक पसंती दिली जाते. त्यामागील कारण म्हणजे म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा चांगल्या प्रतीचे असते. आज आपण म्हशींच्या अशा प्रगत जातींबद्दल माहिती पाहणार आहोत ज्यातून जास्त दूध मिळू शकते. चलातर मग जाणून घेऊया माहिती.
१) मुऱ्हा म्हैस
मुऱ्हा म्हशीची जात ही जास्त दूध देणारी जात मानली जाते. भारतातील अनेक पशुपालक या म्हशीचे संगोपन करून चांगला नफा कमावत आहेत. या म्हशीची दूध देण्याची क्षमता इतर सर्व देशी जातींपेक्षा जास्त आहे. त्याचे पालन करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून या जातीच्या खरेदीवर अनुदानही दिले जात आहे. या म्हशीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे दूध घट्ट असून त्यात फॅटचे प्रमाण ७ टक्के आहे. भारतात ही म्हैस मुख्यतः हरियाणा आणि पंजाबमध्ये पाळली जाते. एवढेच नाही तर दुधाचा दर्जा चांगला असल्याने इटली, बल्गेरिया, इजिप्त इत्यादी देशांमध्येही या म्हशीचे पालन केले जाते.
२) जाफ्राबादी म्हैस
जाफ्राबादी जातीच्या म्हशींचाही जास्त दूध देणाऱ्या जातींमध्ये समावेश होतो. त्याचे मूळ ठिकाण गुजरातचे जाफ्राबाद आहे. त्यामुळे त्याचे नाव जाफ्राबादी म्हैस पडले आहे. ही म्हैस दररोज 30 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. ही म्हैस वजनाने खूप जड आहे. म्हशीची ही जात दुधाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अतिशय चांगली मानली जाते. ही जात डेअरी उद्योगासाठीही चांगली आहे. त्यामुळे या म्हशीचे पालन करून तुम्ही चांगला पैसे कमावू शकता.
३) भदावरी म्हैस
म्हशीची भदावरी जात ही देखील एक जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी एक आहे, जरी ही जात मुराह जातीच्या म्हशीच्या तुलनेत थोडे कमी दूध देते, परंतु तिचे दूध तूप तयार करण्यासाठी पुरेसे मानले जा ते. या म्हशीला भदावरी हे नाव कसे पडले त्यामागे एक कथा आहे. स्वातंत्र्यापूर्वी, इटावा, आग्रा, भिंड, मुरैना आणि ग्वाल्हेर जिल्ह्यांचा काही भाग असलेले भदावार नावाचे छोटे राज्य होते. म्हशीची ही जात भदावार परिसरात विकसित झाल्यामुळे तिला भदावरी हे नाव पडले. या म्हशी देखील दुधाला चान्गल्या असल्याने अनेकजण यांचे पालन करतात.
४) सुरती म्हैस
सुरती म्हशींचाही म्हशींच्या उच्च दूध देणाऱ्या जातींमध्ये समावेश होतो. ही म्हैस गुजरातच्या आसपासच्या भागात आढळते. या जातीचे उत्तम प्राणी गुजरातमधील आनंद, बडोदा आणि कैरा जिल्ह्यात आढळतात. या म्हशीला सुरतीशिवाय चरोतारी, दख्खनी, गुजराती इत्यादी नावांनी ओळखले जाते. या जातीची खास गोष्ट म्हणजे ही जात वजनाने हलकी असून डोके लांब आहे. यामुळे म्हशींच्या इतर जातींच्या तुलनेत कमी खाद्य लागते. याचे पालन करूनही चांगले दूध मिळू शकते.