Animal Poisoning: जनावरांना होणारी विषबाधा; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बरेचदा जनावरांच्या खाण्यात विषारी (Animal Poisoning) वनस्पती किंवा अखाद्य पदार्थ आल्यास त्यांना विषबाधा होते. युरिया कीटकनाशके, तणनाशक , उंदीरनाशक इत्यादी रासायनिक घटक किंवा त्याचे अंश जनावरांच्या खाद्यात गेल्यामुळे विषबाधा होते. यासाठी वेळीच योग्य उपाय केले नाही तर जनावरे मृत्युमुखी सुद्धा पडतात. जाणून घेऊ या विषबाधेची कारणे (Animal Poisoning), लक्षणे आणि त्यावर करायचे उपाय.  

युरियाची विषबाधा (Animal Poisoning)

युरियाचा पशू खाद्यामध्ये अधिक वापर. उदा. युरिया- मोलॅसिस, मुरघास, युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीन भरडा खाऊ घालणे, युरिया किंवा इतर खतांची पोती जनावरांनी चाटणे, दुभत्या जनावरांना खुराकातून अधिक प्रमाणात युरिया खाऊ घालणे इत्यादी कारणामुळे ही विषबाधा होते.

विषबाधेची लक्षणे (Symptoms of Poisoning)

  • जनावरांच्या तोंडाला फेस येऊन त्यांना झटके येतात
  • जनावरांना नीट उभे राहता येत नाही
  • जनावरांची पोटफुगी होते. पोटामध्ये वेदना होतात
  • जनावरे सतत उठ बस करतात. थोडी थोडी लघवी करतात
  • जनावरांचे डोळे मोठे होतात, जनावरे बेशुद्ध होतात व शेवटी मृत्यू होतो
  • अधिक प्रमाणात युरिया खाल्ला असेल, तर अर्ध्या तासामध्येच मृत्यू होतो

उपचार

  • विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित जनावरांना 2 ते 8 लिटर ताक पाजावे.
  • ताक उपलब्ध नसल्यास माठातील किंवा रांजणातील थंड पाणी पाजावे. मोठ्या जनावरांना 40 लिटर व लहान जनावरांना 20 लिटर पाणी पाजावे.
  • पोटातील हवा काढण्यासाठी जनावरांच्या तोंडात लगाम घालावा. यामुळे जनावरांचे तोंड सतत उघडे राहून पोटातील अमोनिया वायू बाहेर पडेल.
  • शक्य तितक्या लवकर पशु वैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

ज्वारीच्या कोवळ्या पोंग्याची विषबाधा (Poisoning of Sorghum Shoots)

या विषबाधेला ‘किरळ लागणे’ असेही म्हणतात. ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.

लक्षणे

  • जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा मृत्यू होतो
  • कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट फुगते, जनावर अस्वस्थ होते.
  • श्‍वासोच्छ्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात. श्वसनाला त्रास होतो, जनावरे थरथर कापते.

उपचार (Treatment)

  • जनावरांचे पोट फुगलेले दिसताच त्वरित पशु वैद्यकाच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.

ऑक्झॅालिकची विषबाधा (Oxalic Poisoning)

काळा बुरशीयुक्त कडबा जनावरांच्या खाण्यात आल्यास, रब्बी गहू- हरभरा पिकांत वाढणारे “ढोरकाकडा” नावाचे तण जनावरांनी खाल्ल्यास ही विषबाधा होते.

लक्षणे

  • या विषबाधेमुळे रक्तात कॅल्‍शियमची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अडखळत चालणे, कुंथणे, पोटफुगी, लघवी, थेंबाथेंबाने होणे किंवा अजिबात न होणे.
  • गुदद्वारापासून ते मागील दोन पायांतून अंडकोषापर्यंत सूज आलेली आढळून येते.

उपाय

  • बुरशीयुक्त कडबा अथवा गहू- हरभऱ्यांतील उपटून टाकलेले तण जनावरांना खाण्यास देऊ नये.
  • विषबाधेचे प्रमाण कमी करण्यासाठी कॅल्‍शियमचे इंजेक्शन पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने द्यावे.

सरकीची विषबाधा (Animal Poisoning)

दुधाळ जनावरांना अथवा बैलांना सरकी देण्यात येते. कीटक प्रतिबंधक व अधिक उत्पादन देणाऱ्या कपाशीच्या सरकीमध्ये गॉसीपॅाल या विषारी द्रव्याचे प्रमाण अधिक असते. गॉसीपॅालयुक्त सरकी जनावरांच्या सतत खाण्यात आल्यास दीर्घकालीन विषबाधा (Animal Poisoning) होण्याची शक्यता असते.

उपाय

  • सरकी जनावरांना सतत खाण्यात देऊ नये.
  • चार आठवडे सतत खाद्य दिल्यानंतर एखादा आठवडा खाद्य देऊ नये.
error: Content is protected !!