Animal Weekly Holiday: झारखंडमधील या गावात मिळते ‘जनावरांना साप्ताहिक सुट्टी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जगभरात मनुष्याला आठवड्यातले (Animal Weekly Holiday) सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी मिळते, आयटी तसेच इतर काही क्षेत्रात तर ही सुट्टी आठवड्यात दोन दिवसाची सुद्धा असते. तुम्ही कधी प्राण्यांची साप्ताहिक सुट्टी ऐकली आहे का? झारखंडमधील एका गावात रविवारी प्राण्यांना सुट्टी (Animal Weekly Holiday) देण्याची परंपरा गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा कशी सुरू झाली ते जाणून घेऊ या.

झारखंडमधील (Jharkhand) लातेहारमधील 20 हून अधिक गावांमध्ये ही परंपरा 100 वर्षांहून अधिक काळापासून जोपासली जात आहे. येथे रविवारी बैल व इतर गुरे वापरली जात नाहीत. या दिवशी त्यांना सुट्टी असते, म्हणजे फक्त विश्रांती दिली जाते जेणेकरून त्यांचा आठवड्याचा थकवा दूर करून त्यांना ताजेतवाने (Animal Relaxation) करता येईल.

प्राण्यांना दिवसभर विश्रांती मिळते (Animal Weekly Holiday)

लातेहारचे शेतकरी आणि पाळीव प्राणी यांच्यात फार आत्मीयतेचे नाते हे जन्मापासूनचे आहे. अशा परिस्थितीत तेथील लोक वर्षानुवर्षे प्राण्यांच्या सुख-सुविधांची काळजी घेत आहे. प्राण्यांच्या मेहनतीमुळे आणि सहकार्यामुळे जगातील लोकांची भूक भागते. या कष्टकरी जनावरांना विश्रांती देण्यासाठी लातेहारच्या काही गावात लोकांनी नियमही बनवला आहे. प्राण्यांना इथे आठवड्यातून एक दिवस सुट्टी दिली जाते असा नियम आहे. म्हणजे रविवारी जनावरांसोबत कोणतेही काम केले जात नाही. गुरांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्याची परंपरा लातेहार जिल्ह्यातील हर्खा, मोंगार, लालगडी आणि पक्रारसह इतर अनेक गावांमध्ये प्रचलित आहे.

गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या पूर्वजांनी बनवलेले नियम अगदी तार्किक आहेत, कारण माणसांप्रमाणे प्राण्यांनाही विश्रांतीची आवश्यकता असते. प्राणी त्यांच्या कष्टाच्या जोरावर माणसांना त्यांच्या उपजीविकेत मदत करतात. अशा परिस्थितीत प्राण्यांच्या चांगल्या-वाईटाची काळजी घेणे हे मानवाचेही कर्तव्य आहे.

100 वर्षांची परंपरा (Animal Weekly Holiday)

ही संकल्पना सुमारे 100 वर्षांपासून आहे कारण गावकरी सांगतात की 10 दशकांपूर्वी नांगरणी करताना एक बैल मरण पावला होता. विचारमंथनानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, बैलाला जास्त थकवा आणि कामाचा ताण सहन होत नाही, त्यामुळे एक दिवस जनावरे आणि गुरेढोरे कामासाठी वापरायचे नाहीत, असा पंचायतीमध्ये सामूहिक निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.  विशेष म्हणजे गुरांच्या सुटीच्या दिवशी शेतकरी किंवा गावकरी स्वतः नांगरणी करतात.

ही परंपरा आपल्या गावात वर्षानुवर्षे सुरू असून खूपच चांगली आहे असे तेथील ग्रामस्थ सांगतात. कारण प्राणी आणि मानव हे एकमेकांना पूरक आहेत. दोघांचे हित एकमेकांच्या हितामध्ये आहे असेहि ते म्हणतात.

आपल्या कडे सुद्धा जनावरांबद्दल कृतज्ञता म्हणून पोळा हा सण ( Pola festival) दरवर्षी साजरा केला जातो. पण झारखंड मधील शेतकऱ्यांनी सुरु केलेली ही प्रथा खरच कौतुकास्पद आहे.

error: Content is protected !!