Apple Bore : ही आहेत पाच प्रमुख बोर उत्पादक राज्य; वाचा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बोर लागवड (Apple Bore) केली जाते. मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बोराची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारण 50 हून अधिक बोराच्या जाती आहे. लोक मोठ्या आवडीने आंबट बोरांवर ताव मारतात. त्यामुळे बोराला बाजारात मोठी मागणी असते. उष्णकटीबंधीय आणि कमी पाण्यातही बोराचे उत्पादन घेता येते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बोर पिकातून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशातील प्रमुख पाच बोराचे उत्पादन (Apple Bore) घेणारी राज्य कोणती आहेत? या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत..

मध्यप्रदेश राज्य प्रथम स्थानी (Apple Bore Top Five Producing States)

बोर पिकाच्या अनेक जाती आहेत. यामध्ये ‘थाई ऍपल बोर’ (Apple Bore) ही जात विशेष प्रसिद्ध आहे. या बोराला ‘शेतकऱ्यांचे सफरचंद’ असेही म्हणतात. देशातील एकूण बोराच्या उत्पादनापैकी 21.37 टक्के उत्पादनासह मध्य प्रदेश हे राज्य बोर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. मध्यप्रदेशातील माती आणि हवामान बोर पिकासाठी उत्तम मानली जाते. याशिवाय मध्यप्रदेशातील शेतकरी देशातील एकूण लागवडीपैकी बोराची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

भारतामध्ये 18 ते 20 प्रजाती

बोर हे भारतातील प्राचीन फळ असून, देशातील सर्वच भागांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहे. जगात आढळणाऱ्या 50 बोराच्या प्रजातींपैकी भारतात 18 ते 20 प्रजाती आढळतात. देशातील बोराच्या उत्पादनात गुजरात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण बोराच्या उत्पादनापैकी 18.09 टक्के बोराचे उत्पादन गुजरातमध्ये होते. बोराचे उत्पादन हे व्यापारिकदृष्ट्या महत्वाचे मानले गेले.दरम्यान, देशातील एकूण बोराच्या उत्पादनापैकी 13.15 टक्के उत्पादनासह छत्तीसगड हे राज्य बोराच्या उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सहा राज्यांमध्ये 80 टक्के उत्पादन

बोराचा उपयोग हा प्रामुख्याने ताजी फळे खाण्यासोबतच, सुखवून शीतल पेयांमध्ये केला जातो. देशातील एकूण बोराच्या उत्पादनापैकी 10.41 टक्के बोर उत्पादनासह आंध्र प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. बोरामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन-सी, विटामिन-ए आणि विटामिन-बी असते. महाराष्ट्रात एकूण बोराच्या उत्पादनापैकी 9.26 टक्के उत्पादनासह महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. तर 7.99 टक्के उत्पादनासह हरियाणा सहाव्या क्रमांकावर आहे. वरील सहा राज्यांमध्ये देशातील एकूण बोराच्या उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन घेतले जाते.

error: Content is protected !!