Arka Rakshak Variety : टोमॅटोचे ‘अर्का रक्षक’ वाण; एकरात मिळेल लाखोंचे उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात टोमॅटो पिकाखालील क्षेत्र (Arka Rakshak Variety) मोठ्या प्रमाणात आहे. टोमॅटो पिकातून अनेक शेतकरी करोडपती झाल्याच्या यशोगाथा मागील वर्षी समोर आल्या होत्या. मात्र टोमॅटोचे अधिक उत्पादन घेता यावे. त्यास विक्रीसाठी चांगले मार्केट उपलब्ध व्हावे, यासाठी निर्यातक्षम वाणाची निवड करणे खूप गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘अर्का रक्षक’ या टोमॅटोच्या सर्वोत्तम वाणाबद्दल (Arka Rakshak Variety) जाणून घेणार आहोत. हे वाण निर्यातीसाठी देशातील सर्वात महत्वाचे मानले गेले आहे.

किती मिळते उत्पन्न? (Arka Rakshak Variety Of Tomato)

टोमॅटोला देशांतर्गत बाजारासह बाहेरील देशांमध्ये मोठी मागणी आहे. भाजीसोबतच चटणी आणि सूप बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. हीच बाब लक्षात घेऊन बंगळुरू येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने (आयएचआरआय) अधिक उत्पादन देणाऱ्या आणि निर्यातक्षम अशा ‘अर्का रक्षक’ या टोमॅटो वाणाची (Arka Rakshak Variety) निर्मिती केली आहे. टोमॅटोला योग्य तो भाव मिळाल्यास, या वाणापासून शेतकऱ्यांना एकरी 5 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. भारता व्यतिरिक्त या टोमॅटो वाणाला घाणा, मलेशिया तसेच पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये खूप मागणी आहे. या वाणाच्या एका झाडापासून संपूर्ण हंगामात 18 किलो उत्पादन मिळते. यामुळेच या टोमॅटोची गुणवैशिष्ये आणि मागणी पाहून राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून देशातील टोमॅटो उत्पादनात वाढ होण्यासाठी अर्का रक्षक या वाणाच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे.

रोगप्रतिकारक्षम वाण

कोणत्याही पिकाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाच्या व्यवस्थापनासह त्याच्या योग्य वाणाची लागवड होणे खूप महत्वाचे असते. अर्का रक्षक हे वाण इतर वाणांच्या तुलनेत रोगप्रतिकारक्षम असून, त्यावर शेतकऱ्यांमध्ये प्रचलित नावाने ओळखला जाणारा ‘घुबडा’ हा पडत नाही. त्यालाच पर्णगुच्छ किंवा लीफकर्ल असेही म्हणतात. याशिवाय भुरी आणि करपा या रोगांना देखील हे वाण बळी पडत नाही. ज्यामुळे सर्वाधिक टोमॅटो उत्पादन देणारे वाण म्हणून हे वाण समोर आले आहे.

सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारातही टोमॅटो 32 ते 40 रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. सध्याच्या किमतींनुसार एकरात या वाणापासून 5 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. साधारणपणे उन्हाळ्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झालेली असते. त्यामुळे ‘अर्का रक्षक’ टोमॅटो वाणाची नियोजनातून लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते.

error: Content is protected !!