Aromatic Plants : औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन; मार्गदर्शन, बाजारपेठ एका क्लिकवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशामध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड (Aromatic Plants) वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळाकडून (CSIR) अरोमा या अँपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या लागवडीबाबत माहिती मिळावी. या हेतूने या अँपची निर्मिती करण्यात आली असून, 31 जानेवारी 2024 रोजी हे अँप सीएसआयआरकडून लॉन्च केले जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींबाबत (Aromatic Plants) सर्व माहिती मिळू शकणार आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन (Aromatic Plants Guidance, Market In One Click)

केंद्र सरकारच्या अरोमा मिशनअंतर्गत या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना औषधी आणि सुंगधी वनस्पतींची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीपासून ते कापणीपर्यंत सर्व माहिती दिली जाणार आहे. औषधी वनस्पतींचे गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे मिळवावे? योग्य प्रजातींची निवड, कीड आणि रोग नियंत्रण, त्यासंबंधीच्या उपाययोजना अशी सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या अँपच्या मदतीने औषधी वनपस्ती उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांची गरज असणाऱ्या उद्योगांना एकत्रितपणे जोडण्याचे महत्वपूर्ण काम केले जाणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अगदी सहजपणे बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.

बाजारपेठ उपलब्ध होणार

अरोमाच्या माध्यमातून देशभरातील औषधी वनस्पतींची मागणी असलेल्या नोंदणीकृत कंपन्या आणि शेतकरी एकमेकांसोबत संपर्क करू शकणार आहे. त्यामुळे हे अँप शेतकऱ्यांसाठी औषधी वनस्पतींचे मार्केट प्लेस ठरणार आहे. शेतकरी आणि औषधी वनस्पतींपासून प्रॉडक्टस निर्मिती करणाऱ्या कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर येऊ शकणार आहे. असे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळाने (सीएसआयआर) या अँपबाबत म्हटले आहे.

देशातील आदिवासी भागांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव आहे. अशा देशभरातील भागांसाठी सीएसआयआरकडून 20 कस्टर बनवण्यात आले आहे. काही भागांमध्ये रस्ते नाही. मात्र अशा भागांमध्ये देखील सीएसआयआरकडून औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. असेही सीएसआयआरने म्हटले आहे. अश्वगंधा, कोरफड, शतावरी, गवती चहा, पाल्मरोझा, अडुळसा, ब्राम्ही, सर्पगंधा, वेखंड, अनंतमूळ, कालमेघ, तुळस, सदाफुली, पिंपळी, सफेदमुसली, चंदन, गावठी गुलाब, माका, नानारी, दशमूल, कचोरा, सिट्रोनेला, पुदिना, जिरेनियम, आवळा अशा अनेक औषधी वनस्पती आहेत. ज्यांच्या शेतीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो.

error: Content is protected !!