Azolla Fodder : असे कोणते खाद्य आहे जे पोल्ट्री, डेअरी दोन्ही व्यवसायांना चालते?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीला जोडधंदा (Azolla Fodder) म्हणून पोल्ट्री व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय हे महत्वाचे व्यवसाय मानले जात आहे. राज्यात बरेच शेतकरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीसोबतच पशुपालन व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. या व्यवसायामुळे लोकांना खूप फायदा झाला आहे. याशिवाय पोल्ट्री व्यवसायातुन देखील शेतकऱ्यांची चांगली प्रगती झाली आहे. पोल्ट्री व्यवसायात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबड्यांचे खाद्य असते. कोंबड्यांना योग्य खाद्य खायला दिल्यास त्यांची वाढ भरभर होते. अर्थात कोंबड्यांना योग्य खाद्य दिल्यास कोंबडीचे वजन आणि अंडी उत्पादन दोन्हीमध्ये वाढ होण्यास मदत होते. तसेच दूध उत्पादन वाढीसाठी देखील ॲझोलाचा (Azolla Fodder) प्रभावी वापर होतो.

ॲझोला हे पूरक खाद्य (Azolla Fodder For Dairy And Poultry Farmers)

डेअरी आणि दुग्ध व्यवसायासाठी ज्या चाऱ्याबद्दल बोलत आहोत. त्याचे नाव ॲझोला (Azolla Fodder) आहे. याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा मग वाचले देखील असेल. ॲझोला हे खाद्य जनावरांसाठी कमी खर्चाचे, पौष्टिक खाद्य आहे. केवळ कोंबड्यांसाठीच नाही तर सर्व दुग्धजन्य जनावरांसाठीही देखील ते फायदेशीर आहे. कोरड्या वजनाच्या आधारावर, त्यात 25-35 टक्के प्रथिने, 10-12 टक्के खनिजे आणि 7-10 टक्के अमीनो ऍसिड असते. ही एक वेगाने वाढणारी शेवाळवर्गीय वनस्पती आहे. पेरणीच्या 8-10 दिवसांत त्याचे उत्पादन सुरू होते. अझोलाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुकूल वातावरणात 5 दिवसात त्याचा आकार दुप्पट होतो. वर्षभरात प्रति हेक्टर 300 टनपेक्षा जास्त उत्पादन होऊ शकते.

दूध उत्पादन वाढीसाठी महत्वाचे

ॲझोलामध्ये बहुतेक अत्यावश्यक अमीनो ऍसिड, मँगनीज, बायोपॉलिमर आणि बीटा कॅरोटीन असतात. या बायोकेमिकल्सने समृद्ध असल्याने ते प्राण्यांसाठी एक उत्कृष्ट सेंद्रिय खाद्य मानले गेले आहे. प्राणी ओझोला सहज पचवू शकतात कारण त्यात फायबर आणि लिग्निन कमी प्रमाणात असते. पूरक आहार म्हणून अझोला वापरल्याने एकूण दूध उत्पादनात 15-20 टक्के वाढ होते. सध्या देशातील विविध राज्यांमध्ये चारा आणि पोषक तत्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी ॲझोला उत्पादनास मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. पाण्याच्या अस्वच्छ स्त्रोतांमध्येही ॲझोलाचे उत्पादन सहज घेतले जात आहे.

कोंबड्यांसाठी फायदेशीर

पोल्ट्री व्यवसाय करताना कोंबड्यांना खाद्य म्हणून प्रति कोंबडी दररोज 10 ते 15 ग्रॅम ॲझोला खायला दिले. तर कोंबड्यांचे वजन आणि अंडी उत्पादन क्षमतेत 10 ते 15 टक्के वाढ होते. ॲझोलामध्ये प्रथिने, अमिनो आम्ल, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे आणि मॅग्नेशियम इत्यादी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ते कोंबडीसाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे.

error: Content is protected !!