Bacchu Kadu : शेतकऱ्यांसाठी कितीही करा, जातीसाठी केलं की माणूस लगेच मोठा – बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “शेतकऱ्यासांठी कितीही करा, कितीही केसेस (Bacchu Kadu) अंगलट येउद्यात. मात्र जातीपातीची राजकारण केले की लगेच माणूस मोठा होतो.” अशा शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी खंत व्यक्त केली आहे. 2017 मध्ये पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड करत, अधिकाऱ्याच्या खुर्चीला काळे फासल्याचा आराेप आमदार बच्चू कडू यांच्यावर आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल आहे. शेतकऱ्यांसाठीच्या लढ्यातील या केसची श्रीरामपूर न्यायालयात सुरु आहे. या सुनावणीला हजर असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी हे विधान केले आहे.

काय आहे प्रकरण? (Bacchu Kadu On Farmers Issue)

2017 मध्ये प्रहार संघटनेने आसूड यात्रा काढली होती, तेव्हा काही शेतकरी आमच्याकडे तक्रार घेऊन आले होते. त्यांचे म्हणणे होते की त्यांच्या शेतात पाणी सोडले जात नाही. त्यानंतर आम्ही सरकारला त्यासंदर्भातलं निवेदन द्यायला गेलो. त्या आंदोलनाबाबत आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्या शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. पण आम्ही मात्र सध्या कोर्टात येरझाऱ्या मारत आहोत. ते शेतकरी आम्हाला दिसत नाहीत. पण आम्ही कोर्टात दिसतोय. हा फरक आहे. शेतकऱ्यासाठी काही कराल तर फार नाव होत नाही. जातीसाठी काही केले तर माणूस लगेच मोठा होतो” 2017 मध्ये पाटबंधारे विभागाने दाखल केलेल्या केसची सुनावणी पार पडली, यावेळी न्यायालयाने कडू यांचा जामीन मंजूर केला. केस सुनावणीनंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

शेतकरी प्रश्नांबाबत उदासीनता का?

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी निर्यात बंदीसारखे मोठे निर्णय घेतले जात आहे. एवढे मोठे निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात एका मिनिटात घेतले जातात. शेतकऱ्यांच्या डोक्यात संताप का नाही? जातीसाठी लोक पेटतात, तसे शेतकऱ्यांसाठी लोक पेटू लागले की जातीधर्माचे प्रश्न बाजूला पडून शेतीचे प्रश्न अजेंड्यावर येतील. आपण तो प्रयत्न करू, शेतकरी-मजुरांची हक्काची लढाई मागे पडतेय. जाती-धर्माची लढाई पुढे येतेय”, असेही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटले आहे. राजकारणी फार बदमाश असतात. आम्ही महत्त्वाची कामे कधीही करत नाहीत. शिक्षणाचे वाटोले झाले आहे. विखे पाटील-बच्चू कडूंचा मुलगा ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेत मतदान करणाऱ्याचा पोरगा शिकू शकत नाही. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!