Bahubali Tractor : शेतकऱ्यांसाठी ‘ऐस’ कंपनीचा बाहुबली ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या घडीच्या सर्वच ट्रॅक्टर कंपन्यांकडून विविध रेंजमध्ये ट्रॅक्टरची (Bahubali Tractor) निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मिनी ट्रॅक्टर, मध्यम रेंजचे ट्रॅक्टरही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र आता तुम्ही आपल्या मोठ्या जमिनीच्या क्षेत्रासाठी एखादा बलवान ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल तर ‘ACE DI 9000 4WD’ हा बाहुबली ट्रॅक्टर तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. कारण 90 HP चा असलेला हा ट्रॅक्टर, बाहुबली (Bahubali Tractor) या नावाप्रमाणेच बलवान आहे. ऐस कंपनीच्या या ‘ACE DI 9000 4WD’ ट्रॅक्टरबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘ACE DI 9000 4WD’ ट्रॅक्टरची माहिती (ACE Bahubali Tractor For Farmers)

भारतातील ‘ऐस’ कंपनीकडून (Bahubali Tractor) मोठ्या शेतकऱ्यांची गरज ओळखून या शक्तीशाली ट्रॅक्टर निर्मिती करण्यात आली आहे. कंपनीचा हा शक्तीशाली ट्रॅक्टर शेतातील कठीणातील कठीण काम अगदी सहज करतो. या ट्रॅक्टरला इंधनही (डिझेल) कमी लागत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ऐस कंपनीच्या या ट्रॅक्टरला 2200 आरपीएमसह 90 HP पावर जनरेट करणारे 4088 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 4 सिलेंडर दिलेले आहे. कंपनीने या ट्रॅक्टरला ड्राय एअर क्लिनर आणि एअर फिल्टरची सुविधा दिली आहे. हा ट्रॅक्टर 2.5 टन इतक्या अधिकच्या लोडिंग क्षमतेसाठी तयार करण्यात आला आहे.

‘ACE DI 9000 4WD’ ट्रॅक्टर वैशिष्ट्ये

‘ऐस’ कंपनीच्या या ट्रॅक्टरचे (Bahubali Tractor) वजन 2976 किलो इतके आहे. हा ट्रॅक्टर कंपनीने 4020 MM लांबी, 2040 MM रुंदी आणि 2670 MM उंचीमध्ये तयार केला आहे. तर त्याचा व्हीलबेस 2235 MM इतका ठेवला आहे. त्यामुळे तो कठीण कामही अगदी सहज करतो. याशिवाय कंपनीने त्याला 420 MM ग्राउंड क्लीयरन्स दिला आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पावर स्टिअरिंग दिले असून तो चालकाला आरामदायी अनुभव प्रदान करतो. ‘ACE DI 9000 4WD’ ट्रॅक्टरला कंपनीने 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे. याशिवाय कंपनीने ट्रॅक्टर डबल क्लच देखील दिला आहे. जो Synchro Shuttle स्वरूपात उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 1.7 ते 35.08 किमी प्रति तास इतका वेग दिला आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 65 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरला 12.4 x 24.0 आकाराचे पुढील टायर तर 18.4 x 30.0 आकाराचे मागील टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

तुम्ही आता ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आणि त्याचा रुबाब पाहून विचारात पडला असाल की नेहमी ‘ACE DI 9000 4WD’ या किंमत किती असेल. तर कंपनीने भारतीय शेतकऱ्यांचे बजेट लक्षात घेऊन या ट्रॅक्टरची शोरूम किंमत ही 5.60 लाख ते 15.75 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. त्यामुळे तुम्हाला आपआपल्या भागात या ट्रॅक्टरची ऑन प्राईस वेगळी असणार आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने २ वर्षांची वारंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!