Bajra Farming : पुण्यात तुर्कीच्या बाजरीची लागवड; 3 लांब कणीस, 30 गुंठ्यात 25 क्विंटल उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती (Bajra Farming) आहे. मात्र, असे असतानाही काही शेतकऱ्यांना शेततळे आणि बोअरवेलला चांगले पाणी आहे. तर काही शेतकऱ्यांना धरणातून आवर्तने मिळत असल्याने, त्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शेतकरी अविनाश गायकवाड यांनी देखील आपल्याकडे उपलब्ध पाण्याच्या जोरावर उन्हाळी बाजरीची लागवड केली होती. विशेष म्हणजे त्यांनी देशी किंवा हायब्रीड वाणांची लागवड न करता, तुर्कीच्या बाजरीच्या शेतीचा (Bajra Farming) अनोखा प्रयोग केला आहे.

नाशिकहून मागवले बियाणे (Bajra Farming Pune Farmer)

मुळशी तालुक्यातील जांब गावचे शेतकरी अविनाश गायकवाड हे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. सोशल मीडियावरून शेतीशी संबंधित माहिती घेत असतात. त्यांना नाशिकमधील शेतकऱ्याने केलेल्या तुर्की बाजरीची (Bajra Farming) माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्याही शेतात तुर्कीच्या बाजरीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. नाशिकमधील संबंधित शेतकऱ्याकडून, त्यांनी बियाणे मिळवून तुर्की बाजरीची पेरणी केल्याचे शेतकरी गायकवाड सांगतात.

दीड बिघ्यात 25 क्विंटल उत्पादन

शेतकरी गायकवाड सांगतात, त्यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रात बाजरी लागवड केली आहे. तुर्की बाजरीची उंची 10 ते 11 फुटांपर्यंत वाढली आहे. तिला साधारण 3 फुटांपर्यंत लांबीची कणीस आले आहे. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे, यामुळे त्यांना 30 गुंठ्यामध्ये 20 ते 25 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. अविनाश गायकवाड यांनी कृतीतून आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

देशी बाजरीपेक्षा चौपट उत्पादन

तुर्की बाजरी ही देशी बाजरीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या बाजरी पिकाची उंची 10 ते 11 फुटापर्यंत असते. त्याला 3 फूट लांबीची कणसे येतात. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे हे या बाजरीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे उत्पन्नही देशी बाजरीपेक्षा चौपट जास्त असते, असे ते सांगतात. मुळशी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेतजमिनी विकल्या. परंतु काही शेतकऱ्यांनी त्या योग्य पद्धतीने कसल्या. आपल्या पूर्वजांनी या जमिनी आपल्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आपण देखील पुढच्या पिढीसाठी या जमिनी राखून ठेवूया, असे गायकवाड यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!