Bakhsish Rotavator : शेतकऱ्यांसाठी मजबूत आणि टिकाऊ रोटाव्हेटर; करतो इंधनाची बचत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसांत यंदाचा खरीप हंगाम (Bakhsish Rotavator) सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मशागतीची कामे सुरु लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या काही शेतकरी शेतीविषयक अवजारे घेण्याचा विचार करत असतील. त्याबाबतची आर्थिक जुळवाजुळव देखील शेतकऱ्यांनी केली असेल. त्यामुळे तुम्ही देखील एखादा टिकाऊ आणि मजबूत रोटाव्हेटर घेण्याचा विचार करत असाल. तर बख्सिश कंपनीचा रोटाव्हेटर तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. याच अनुषंगाने आज आपण बख्सिश कंपनीच्या रोटाव्हेटरबाबत (Bakhsish Rotavator) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बख्सिश रोटाव्हेटरबाबत (Bakhsish Rotavator For Farmers)

बख्सिश कंपनीचा रोटाव्हेटर (Bakhsish Rotavator) हा कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये कार्य करण्यासाठी सक्षम आहे. या रोटाव्हेटरसाठी 40 ते 60 हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला हीच कॅट टाइप थ्री पॉइंट लिकेंज दिला आहे. जो ट्रॅक्टरसोबत रोटाव्हेटरला मजबूत पकड धरून ठेवण्यासाठी मदत करतो.

हा रोटाव्हेटर कंपनीने शेतकऱ्यांसाठी साईड चैन ड्राईव्ह इन ऑइल बाथ टाइप ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला मजबूत पाती दिली आहेत. यात प्रामुख्याने 36 पाती बख्सिश आरटीआर आणि 42 पाती बख्सिश आरएसडी असे दोन प्रकारचे रोटाव्हेटर उपलब्ध आहे. कंपनीच्या या रोटाव्हेटरच्या मदतीने 60/69 इंच रुंदी आणि 6 इंच खोल मशागत एकावेळी केली जाते.

‘ही’ आहेत वैशिष्ट्ये?

बख्सिश कंपनीचा मजबूत रोटाव्हेटर (Bakhsish Rotavator) हा ऊस आणि मका यांसारख्य कठीण मुळे असलेल्या पिकांच्या वावराला देखील अगदी कमी वेळात तयार करतो. कंपनीने आपला हा रोटाव्हेटर एकदम मजबूत बनवला असून, तो शेतकऱ्यांसाठी अगदी कमी किमतीत विक्रीसाठी ठेवला आहे. हा रोटाव्हेटर शेतीमध्ये काम करताना मातीची गादी तयार करतो. ज्यामुळे पेरणीला मऊ जमीन तयार होते.

या रोटाव्हेटरची पाती ही मजबूत आणि खास बनावटीची आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करण्यास सोपे जाते. विशेष म्हणजे हा रोटाव्हेटर ओल्या आणि कोरड्या अशा दोन्ही मातीमध्ये काम करण्यास कार्यक्षम आहे. या रोटाव्हेटरला बांधाकडे टोकाला गेल्यानंतर अगदी सहजपणे वळविले जाऊ शकते. ज्यामुळे ट्रॅक्टरचा गिअरबॉक्स सुरक्षित राहण्यास मदत होते.

error: Content is protected !!