Bamboo Farming : 40 एकरात उभारला बांबू प्रकल्प; ठरल्यात राज्यातील पहिल्या महिला शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बांबू लागवडीबाबत (Bamboo Farming) गेल्या काही काळात बरीच जागरूकता निर्माण झाली असून, शेतकरी बांबू लागवडीकडे वळताना दिसत आहे. राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख अनुदान आणि रोपांसाठी अतिरिक्त अनुदान रक्कम दिली जात आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांदघूर या ठिकाणी उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा काशीद व त्यांचे पती राहूल काशिद यांनी एक अनोखा बांबू प्रकल्प (Bamboo Farming) उभारला आहे. ‘द बांबू सेतू’ या नावाने सुरु केलेल्या त्यांच्या या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे.

40 एकर जमीन घेतली भाड्याने (Bamboo Farming First Woman Farmer)

नांदघूर हे गाव भोरपासून 22 किमी अंतरावर असून, त्या ठिकाणी महिला शेतकरी अनुराधा काशीद यांनी 40 एकर जमीन भाड्याने घेऊन ‘द बांबू सेतू’ नावाचा प्रकल्प सुरु केला आहे. त्यामुळे बांबूची शेती करणारी पहिली महिला शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तसेच त्यांनी उभारलेले महाराष्ट्रातील पहिले बांबू पर्यटन केंद्र म्हणून त्यांच्या ‘द बांबू सेतू’ प्रकल्पाची ओळख निर्माण झाली आहे.

9 हजार बांबू तोडणीला

महिला शेतकरी अनुराधा काशीद यांनी भाड्याने घेतलेल्या 40 एकर जमिनीपैकी, सध्या 10 एकरात बांबू लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या द बांबू सेतू प्रकल्पात सध्या सुमारे 20 हजार बांबू असून, 9 हजार बांबू तोडणीला (Bamboo Farming) आले असून, नवीन 3 लाख रोपे तयार केली आहेत. यामध्ये त्यांनी स्थानिक मेस बांबू आणि धोपिल बांबू या दोन जातीच्या बांबूची तसेच, नवीन तीन जातींची लागवड केल्याचे म्हटले आहे.

प्रत्येक बांबूला कलर कोड

साधारणपणे तीन वर्षाचा बांबू हा परिपक्व होतो. ‘द बांबू सेतू’ प्रकल्पामधील बांबू हे किती दिवसांचे व वर्षांचे झाले. अर्थात प्रत्येक बांबू वय ओळखण्यासाठी त्यांनी प्रत्येक बांबूला कलर कोड दिले आहेत. यामध्ये त्यांनी लाल, निळा आणि पांढरा रंगांचा वापर केला आहे. लाल रंग हा परिपक्व झालेल्या बांबूला लावण्यात आला आहे. पुढील वर्षी परिपक्व होणाऱ्या (म्हणजे दोन वर्षांच्या) बांबूला निळा रंग आणि दोन वर्षानंतर तोडीला येणाऱ्या बांबूला पांढरा रंग देण्यात आला आहे. त्यामुळे परिपक्व झालेले बांबूच फक्त तोडले जातात. परिणामी, बांबू विक्री किंवा व्यावसायीक उत्पादनामुळे त्यांच्या आर्थिक उत्पनात देखील वाढ होते. असे महिला शेतकरी अनुराधा काशीद यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!