Bamboo Farming : बांबू लागवडीबाबत जनजागृतीसाठी ‘प्राणवायू रथा’ची सुरुवात – मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये वातावरणात मोठे (Bamboo Farming) बदल झाले आहेत. परिणामी, सध्या शेती व्यवसायाला वाढत्या तापमानवाढीचा फटका सहन करावा लागत असून, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. इतकेच नाही तर पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी देखील मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर बांबू लागवडीसह (Bamboo Farming) पर्यावरणाचे महत्व पटवून देणाऱ्या प्राणवायू रथास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

‘शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी’ (Bamboo Farming Pranvayu Ratha)

बांबूची शेती पर्यावरण संवर्धनासाठी महत्वपूर्ण आहे. बांबूपासून विविध उत्पादने मिळत असून, तो ऑक्सिजन मोठा स्रोत आहे. तसेच बांबूच्या झाडामध्ये (Bamboo Farming) कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यात बांबू लागवडीचे प्रमाण वाढावे, आणि त्याद्वारे पर्यावरणाच्या रक्षणासाठी शेतकरी, नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी व्हावी. या उद्देशाने ही प्राणवायू मोबाईल व्हॅन अर्थात प्राणवायू रथ उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील महामार्गांच्या दोन्ही बाजूला मोठ्या बांबूची लागवड करण्यात यावी. अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत.

बांबू संवर्धनास मदत होणार

राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिक्स फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्राणवायू रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या रथाच्या माध्यमातून बांबू लागवड (Bamboo Farming), उत्पादन व संवर्धन यासाठी मदत होणार आहे. या रथाला हिरवा कंदील देताना राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, सहसंचालक डॉ. व्ही. एम. मोटघरे उपस्थित होते.

error: Content is protected !!