Bamboo Lagvad Anudan Yojana: मनरेगा अंतर्गत ‘बांबू लागवड अनुदान योजना’; जाणून घ्या माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: 100 वर्षे पर्यंत जीवनमान असलेल्या बांबूपासून (Bamboo Lagvad Anudan Yojana) वेगवेगळ्या वस्तू तर बनवता तर येतातच यामुळे जमिनीची धूप कमी होऊन जलसंधारण सुद्धा होते. अलीकडच्या काळात बांबूचा वापर वीज निर्मिती (Electricity) आणि इथेनॉल निर्मितीसाठी (Ethenol Production) सुद्धा होऊ शकतो हे लक्षात आल्याने बांबूचे महत्व ( Importance Of Bamboo) वाढले आहे.

केंद्र आणि राज्य सरकार सुद्धा बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देत असून यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येत आहे. जाणून घेऊ या मनरेगा (MGNREGA Maharashtra) अंतर्गत बांबू लागवड अनुदान योजना (Bamboo Lagvad Anudan Yojana) याबद्दल माहिती.

बांबू लागवड अनुदान योजनेचे उद्दिष्ट (Bamboo Lagvad Anudan Yojana)

  • शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे
  • शेतीच्या उत्पन्नाला जोड देणे, बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे
  • शेतकऱ्यांस उपजिवीकेचे साधन निर्माण करून आर्थिक स्थिती व जीवनमान सुधारणे
  • उपलब्ध शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून देणे.
  • शेती व्यवसायासोबत एक उत्तम जोडधंदा पर्याय उपलब्ध करून देणे.

बांबू लागवड योजनेचे नियम व अटी (Bamboo Lagvad Anudan Yojana)

  • ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे .
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA Maharashtra) अंतर्गत लातूर, छत्रपती संभाजी नगर, आणि जालना जिल्ह्याचा समावेश
  • या योजनेद्वारे शेतकर्‍याला तीन वर्षात प्रति हेक्टरी सात लाख रुपये अनुदान टप्याटप्याने देण्यात येईल.
  •  सिंचनाची सोय नसल्यास विहीर बांधण्यासाठी योजनेमधून 4 लाख रूपयांचे अनुदान देण्यात येईल.
  • या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांना लाभ, तसेच दिव्यांग आणि महिला शेतकरीही पात्र, या सर्वांना क्षेत्राची अट नाही. मात्र, खुल्या प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत लाभ मिळणार आहे.
  • शेतकर्‍यांनी आपले प्रस्ताव ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत तयार करून ग्राम पंचायतचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करायचे आहेत
  • शासनाने निर्धारित केलेल्या नर्सरीतूनच मोफत बांबू रोपे खरेदी करावी लागतील
  • शेतात 15 ×15 अंतरावर बांबूची लागवड करायची आहे.

जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून बांबू लागवड करायची आहे. त्यांनी आपले प्रस्ताव ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत तयार करून ग्राम पंचायतचा ठराव घेऊन पंचायत समितीला मंजुरीसाठी सादर करायचे आहेत.

error: Content is protected !!