Banana Chips Business : दुष्काळी मराठवाड्यात उभारली ‘केळी चिप्स’ कंपनी; वर्षाला 30 लाख कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमालाला योग्य दर मिळत नाही. परिणामी, राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण (Banana Chips Business) आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातील असल्याने कष्ट करण्याची क्षमता उपजतच असल्याने तरुणांना यात यशही मिळत आहे. आज आपण दुष्काळी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील केळीपासून चिप्स निर्मिती उद्योगात पाय रोवलेल्या, एका ग्रामीण भागातील तरुणाच्या यशस्वी व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने अल्पावधीतच केळी चिप्स निर्मिती उद्योगात (Banana Chips Business) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘अन्नपूर्णा चिप्स’ नावाने ब्रँड (Banana Chips Business In Maharashtra)

उमेश मुके असे या तरुणाचे नाव असून, त्याची खाजमापूरवाडी येथे आठ एकर वडिलोपार्जित जमीन आहे. त्याच्या गावाच्या आसपासच्या गावांमध्ये हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. ही संधी मानून उमेशने 2018 साली प्राथमिक स्वरूपात केळी प्रक्रिया उद्योगात (Banana Chips Business) पाय ठेवला. त्याला त्यात खूपच यश मिळाले. ज्यामुळे त्याने पुढे आपल्या आईच्या नावावरून ‘अन्नपूर्णा चिप्स’ कंपनीची स्थापना केली. आज उमेशची कंपनी वार्षिक 30 लाखांची उलाढाल करत आहे. विशेष म्हणजे उमेशचे शिक्षण केवळ 12 वी पर्यंत झालेले असून, त्याने आपल्या कंपनीत एकूण सहा जणांना कायमस्वरूपी रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

कशी सुचली कल्पना?

गेल्या काही वर्षात केळी पिकाला योग्य दर मिळत नसल्याने, त्याच्यासह आसपासच्या गावातील शेतकरी अल्प दराने केळी व्यापाऱ्यांना देत होते. त्यामुळे उमेशला चिप्स निर्मिती उद्योगात येण्याची कल्पना सुचली. यासाठी त्याने युट्युबचा आधार घेत माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये या व्यवसायात सर्व माहिती घेऊन पाय ठेवला. मात्र, कोरोना काळात त्याला मार्केटिंग आणि अन्य बाबींसाठी काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्याने हार न मानता पुन्हा उभारी घेतली. 2020 मध्ये त्याने आपल्या आईच्या नावावरून ‘अन्नपूर्णा चिप्स’ कंपनी सुरु केली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची कंपनी या व्यवसायात आहे.

हेही वाचा : दुष्काळी लातूरमध्ये शेतकऱ्यांनी उभारली कंपनी; कमावतायेत 3 कोटींचा नफा! (https://hellokrushi.com/success-story-devani-pharma-producer-company-latur/)

वार्षिक 30 लाखांचा टर्नओव्हर

उमेशचा ‘अन्नपूर्णा चिप्स’ ब्रँड सध्या इतका फेमस झाला आहे की, हिंगोली आणि आसपासच्या नांदेड, परभणी, वाशीम, बीड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये त्याचा व्यवसाय विस्तारला आहे. या भागांमध्ये त्याच्या केळीच्या चिप्सला (Banana Chips Business) मोठी मागणी आहे. उमेशच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कंपनीत उत्पादित जवळपास 10 ते 12 टन चिप्स वार्षिक विक्री होतात. ज्यातून सध्याच्या घडीला वार्षिक 30 लाखांचा टर्नओव्हर कंपनी करत आहे. आपल्या कंपनीत सध्या घरातील व्यक्तींसह सहा जण कामाला आहेत. आगामी काळात आपला ‘अन्नपूर्णा चिप्स’ हा केळीचा चिप्स ब्रँड राज्यभर प्रसिद्ध कसा होईल? यावर काम करणार असल्याचेही उमेशने शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!