Banana Export : 8,300 कोटींच्या केळी निर्यातीसाठी एपीडाची योजना; शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात केंद्रीय अन्न आणि प्रक्रियाकृत प्राधिकरणाच्या (एपीडा) माध्यमातून बारामती येथून नेदरलँड्सला केळी (Banana Export) निर्यातीसाठीची पहिली खेप यशस्वीरित्या पाठवण्यात आली आहे. ही खेप नेदरलँड्सला यशस्वीरित्या पोहचली असून, या यशानंतर आता एपीडाने पुढील पाच वर्षांमध्ये 1 अब्ज डॉलर्सच्या (8 हजार 300 कोटी रुपयांच्या) केळी निर्यातीची योजना बनवली आहे. सागरी मार्गाने पाठवण्यात आलेली ही खेप नेदरलँड्सच्या बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे आता देशातील केळी निर्यातीला (Banana Export) वाव मिळणार असल्याचे एपीडाने म्हटले आहे.

सद्यस्थितीत भारतातील केळीसह (Banana Export) बहुतांश फळे ही हवाई मार्गाने निर्यात केली जातात. फळे ही नाशवंत असल्याने त्यांच्या पिकण्याचा कालावधी पाहता हवाई मार्गाने फळांची निर्णय केली जाते. मात्र हवाई मार्गाने होणाऱ्या फळांच्या निर्यातीचे प्रमाण हे खूपच नगण्य असते. आता एपीडाच्या माध्यमातून सागरी मार्गाने केळी निर्यातीसाठी यशस्वी प्रयोग करण्यात आला असून, त्यामुळे आता केळी निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. राज्यासह देशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन (Banana Export 8,300 Crore Plan Of APEDA)

एपीडाच्या या निर्यात योजनेअंतर्गत निर्यातीसाठीचा प्रवासाचा काळ, शास्त्रोक्त पद्धतीने फळे पिकण्याच्या कालावधीचे मोजमाप, शेतकऱ्यांना विशिष्ट काळातच केळी काढणीसाठी मार्गदर्शन करणे आदी बाबींचा यात समावेश असणार आहे. याच पद्धतीने एपीडाने विविध फळांसाठी ही योजना तयार केली आहे. एपीडा ही देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणारी संस्था असून, ती इतर निर्यातदार, भागधारकांसोबत मिळून काम करते. एपीडाने कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन, मार्गदर्शन करत गुणवत्तापूर्ण फळांची निर्यातीसाठी ही योजना बनवली आहे.

केवळ एक टक्का निर्यात

भारत हा जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश असून, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, चीन, नेदरलँड्स, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांमध्ये भारतीय केळीला आगामी काळात निर्यातीसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. सध्या एपीडाकडून प्रामुख्याने भारतातून मध्य आशियाई देशांसह युरोपीय देशांमध्ये केळी निर्यात केली जात आहे. जागतिक उत्पादनात भारताचा वाटा हा 26.45 टक्के आहे. तर निर्यातीत भारताचा वाटा फक्त एक टक्का आहे.

error: Content is protected !!