Banana Farming : केळीच्या दरात घसरण, उत्पादन खर्च निघणे मुश्किल; शेतकरी आर्थिक संकटात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे केळीच्या दरात घट होताना दिसतेय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. स्वतःचा उत्पादन खर्च देखील काढता येत नसल्याचं पहायला मिळतंय. हिंगोली जिल्ह्यातील केळी ही चवीला गोड आणि मोठी असल्याने उत्पादन घेतलेल्या केळीला अधिक मागणी आहे. मात्र आता केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

केळीपासून अधिकाधिक नफा मिळतो. जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यात केळी या पिकाचे अधिक उत्पादन घेतले जाते. हिंगोली जिल्ह्यात १६०० हेक्टर केळीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या आठवड्यात केळीला प्रतिक्विंटल २७०० ते ३००० हजार दर पहायला मिळत होते. यामुळे शेतकरी आनंदात होते. मात्र नंतर ९०० ते १००० रुपये केळी पिकाच्या दरात घट झाली.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि वसमत या तालुक्यात या केळींचे उत्पादन घेतले जाते. ही केळी चवदार असल्याने मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र भाव घसरल्याने मोठी आर्थिक समस्या जाणवू लागली आहे. डोंगरकडा गावातील वासुदेव अडकिने हे शेतकरी आहेत. वासुदेव अडकीने यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी अडीच एकर शेतात केळीची लागवड केली. यासाठी २ लाख ५० हजार रुपये खर्च आला. सुरुवातीला केळीला चांगली मागणी होती म्हणून शेतकरी अडकिने खुश होते. मात्र नंतर केळीचा उत्पादन खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.

कांद्याप्रमाणे केळीला मागणी द्या

डोंगरकडा येथील शेतकरी नितीन गावंडे यांनी बँकेचे कर्ज काढून केळीची लागवड केली. परंतु भाव घसरल्याने हे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकरी गावंडे यांच्या समोर उभा राहिला आहे. केळीचे भाव घसरल्याने केली उत्पादनाचे अर्थकारण कोलमडले आहे. केळी उत्पादनात सरकारने या शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहावे. कांद्याप्रमाणे केळीला अनुदान जाहीर करा अशी मागणी शेतकरी करतायत.

error: Content is protected !!