Banana Processing : केळी प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार – गावित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील शेतपिकांचे विशेषतः केळीचे (Banana Processing) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे व मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करणार (Banana Processing) असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे होणारे शेतपिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचेही मंत्री गावित म्हणाले आहे.

शहादा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या (Banana Processing) हिंगणी, कोंढावळ, तोरखेडा, उभादगड, काकरदा, खापरखेडा, दिगर, वडाळी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गेल्या आठवड्यात 30 व 31 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व्हे नुसार 160 शेतकऱ्यांच्या 150 हेक्टरवरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने पपई व केळी या नगदी फळ पिकांचा समावेश आहे. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाई देण्याबाबकचा अहवाल जलद गतीने सरकारला सादर करण्याबरोबरच एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. असेही ते म्हणाले आहे.

प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देणार (Banana Processing In Maharashtra)

ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला त्यांना नियामनुसार भरपाई मिळेल, परंतु ज्यांनी पीकविमा घेतला नाही त्यांचीही सरकारकडून भरपाईची अपेक्षा आहे. प्रत्येक क्षणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शासनाची भुमिका असून, वारंवार अवकाळी, वादळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कृषी प्रकिया उद्योग योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील. त्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतमालावर नुकसान झाल्याबरोबर काही प्रक्रिया करून होणारे नुकसान कमी करता येईल. असेही गावित यावेळी म्हणाले आहे.

error: Content is protected !!