Banana Rate: केळीच्या दरात घसरण; प्रति क्विंटलला मिळतोय 800 रुपये दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या केळीचे दर (Banana Rate) गडगडले असून प्रति क्विंटल केवळ 800 रुपये दर मिळतोय.

आठ दिवसांपूर्वी केळीला(Banana) प्रति क्विंटल 1600 रूपयांचा दर मिळत होता; परंतु आज केळीचा दर (Banana Rate) अर्ध्यावर म्हणजे आठशेवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत (Vasamat) तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना (Banana Farmer) आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन व कापूस या पिकानंतर केळीनेही सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या चिंतेत भर घातल्याचे दिसत आहे.

वसमत तालुक्यात केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असून वसमतची केळी दुबई, अफगाणिस्तान आदींसह इतर देशांतील कानाकोपऱ्यात निर्यात (Banana Export) होते. आठ दिवसांपूर्वी केळीला प्रति क्विंटल 1,600 रुपयांपर्यंत दर मिळत होता. राज्यात वसमत तालुक्यासह तुरळक ठिकाणी केळी बागा (Banana Orchard) असल्याने केळीचे दर वाढून मिळत होते. केळीच्या बागा अधिक प्रमाणात सुरू होताच केळीचे दर गडगडले आहेत. सध्या सोलापूर, बुऱ्हाणपूर व आंध्र राज्यातील केळी बागा सुरू होताच तालुक्यातील केळीचे दर गडगडले आहेत, त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यापूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळी बागांचे नुकसान झाले, आता दराचा (Banana Rate) फटका बसत आहे.

केळीला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटका (Unseasonal Rain Damaged Banana Orchard)

एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा मोठा फटका केळी बागांना बसला आहे. त्यामुळे केळी बागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

पूर्वी केळीला चांगले दर मिळत होते आता अवकाळीचा फटका बसला असून दरही गडगडले आहेत. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल मिळणारे दर (Banana Rate) हे खर्चाच्या मानाने परवडणारे नाही, असे तालुक्यातील शेतकयांनी सांगितले. परिणामी शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

error: Content is protected !!