Banni Buffalo Breed: आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे देशात पहिल्या रेडकूला जन्म देणारी ‘बन्नी म्हैस’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्वच म्हशी (Banni Buffalo Breed) नैसर्गिकपणे रेडकूला जन्म देतात. भारतात वेगवेगळ्या प्राण्यांवर कृत्रिम गर्भधारणाचे प्रयोग केले जातात हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु आज आपण अशा म्हशीबद्दल माहिती घेणार आहोत, जिने IVF तंत्रज्ञानाद्वारे (कृत्रिम गर्भधारणा) देशात पहिल्या रेडकूला जन्म दिलेला आहे. या म्हशीच नाव आहे ‘बन्नी म्हैस’ (Banni Buffalo Breed).

उगम (Banni Buffalo Breed)

दूध उत्पादनासाठी (Milk Production) पाळल्या जाणाऱ्या या म्हशीचा उगम पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून झाल्याचे सांगण्यात येते, भारतात गुजरात मधील कच्छ (Gujarat, Kutch) भागात या म्हशी आढळतात. कच्छ जिल्ह्यात या म्हशीच्या मुबलकतेमुळे तिला ‘कच्छी म्हैस’ किंवा कुंडी म्हैस (Kutchi or Kundi) म्हणूनही ओळखतात.  

शरीर रचना

काळ्या रंगाची असणारी बन्नी म्हैस काही ठिकाणी तपकिरी रंगाचीही दिसू शकते. बन्नी म्हशी आकाराने मध्यम ते मोठ्या असतात आणि त्यांच्या शरीरावर भरपूर केस असतात. बन्नी म्हशीची कातडी पातळ व मऊ असून तिचे कपाळ लांब असते. या म्हशींना गुंडाळलेली शिंगे असतात. म्हशीचे वजन 475-575 किलो असते.

प्रजोत्पादन आणि उत्पादन

या म्हशीचे प्रथम माजावर येण्याचे वय 38 ते 41 महिने या दरम्यान असते.

बन्नी म्हशीचा (Banni Buffalo Breed) एकूण दूध देण्याचा सरासरी कालावधी 300 दिवसांचा असून एका वेताला साधारणपणे 6000 लिटर दूध देण्याची क्षमता असते. ही म्हैस दिवसाला 10 ते 15 लिटर दूध देते.

इतर वैशिष्ट्ये

पाणीटंचाईच्या परिस्थितीत तग धरण्याची क्षमता, दुष्काळी परिस्थितीत लांबचे अंतर कापण्याची क्षमता, उच्च दूध उत्पादकता आणि चांगली रोग प्रतिकारशक्ती हे या म्हशीचे काही खास गुण आहेत. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे देशात बन्नी म्हशीच्या पहिल्या रेड्कुचा जन्म झाला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी सप्टेंबर 2022 ला आयोजित आंतराष्ट्रीय डेयरी सम्मेलन (International Dairy Summit) कार्यक्रमात या म्हशीचे (Banni Buffalo Breed) विशेष कौतुक केले आहे.

error: Content is protected !!