Basmati Rice : यंदा देशातील बासमती तांदळाच्या निर्यातीत 24.40 टक्क्यांनी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशातील बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एपीडाच्या नवीनतम आकडेवारीनुसार, देशात यावर्षी एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या पहिल्या १० महिन्याच्या कालावधीत एकूण 37,959.9 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये पहिल्या १० महिन्यांमध्ये 30,513.9 कोटी रुपयांची नोंदवली गेली होती. तर एकूण वर्षात ती 38524.1 कोटी रुपयांची नोंदवली गेली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत रकमेच्या दृष्टीने विचार करता, बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत एकूण 24.40 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

यंदा मिळाला अधिक दर (Basmati Rice 24.40 Percent In Export)

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत 7446 कोटींची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या हंगामात तांदळाला 1044 यूएस डॉलर प्रत‍ि टन इतका दर आंतरराष्ट्रीय बाजारात मिळाला होता. जो यावर्षीच्या एकूण १० महिन्यामध्ये सरासरी 1117 यूएस डॉलर प्रत‍ि टन इतका मिळाला आहे. अर्थात यावर्षी 90 रुपये प्रत‍ि क‍िलो अधिक दराने बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. तांदूळ बाजारातील जाणकारांच्या मते, यंदा ३१ मार्चपर्यंत अर्थात संपूर्ण २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये बासमती तांदळाची निर्यात 48 हजार कोटींची राहण्याची शक्यता आहे.

का वाढलीये निर्यात?

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा 40 टक्के इतका आहे. परिणामी, जगातील अनेक देशांच्या मोठ्या लोकसंख्येच्या आहारात भारतीय तांदूळ पाहायाला मिळतो. आफ्रिकी देशांसह जगातील अनेक देशांमधील जनता ही भारतीय तांदळावर अवलंबून असते. जुलै 2023 पासून केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी देशातील नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

मात्र, नॉन बासमती तांदळाची निर्यातबंदी केलेली असताना, देशातील बासमती तांदूळ निर्यातीत वाढ नोंदवली गेली आहे. भारतातील सात भागांना बासमती तांदळाच्या उत्पादनाचे जीआय मानांकन मिळाले आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेशचा पश्च‍िम भाग (३० जिल्हे), उत्तराखंड, जम्मूच्या कठुआ आणि सांबा परिसरात मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाचे उत्पादन होते.

error: Content is protected !!