Basmati Rice : 5 लाख टन बासमती तांदूळ निर्यातीस केंद्राची मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांकडून मागणी वाढल्याने (Basmati Rice) केंद्र सरकारकडून नवीन हंगामातील 5 लाख टन मेट्रिक टन तांदूळ निर्यात (Basmati Rice) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय निर्यातदारांकडून एक हजार ते 1500 डॉलर प्रति टन निर्यात मुल्याने करार करण्यात आले असून, तुर्कस्तान, इराक, आणि सौदी अरेबिया हे यावर्षीचे आतापर्यंतचे सर्वाधिक तांदूळ खरेदीदार देश ठरले आहेत. तर उत्तरेकडील हरियाणा राज्य सर्वाधिक बासमती तांदूळ निर्यातदार राज्य ठरले आहे.

भारतातून दरवर्षी 4 दशलक्ष टनांहून अधिक बासमती तांदूळ इराण, इराक, येमेन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स आणि इतर देशांना निर्यात केला जातो. युरोप ही भारतासाठी बासमती तांदूळ निर्यातीची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चालू वर्षी भारतातून आतापर्यंत 45 लाख 58 हजार मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात करण्यात आला आहे.

950 डॉलर प्रति टन निर्यात मूल्य (Basmati Rice Export From India)

देशांतर्गत दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने चालू वर्षीच्या जूनमध्ये गैर-बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर सरकारकडून ऑगस्ट महिन्यात बासमती तांदळाच्या विदेशातील विक्रीसाठी 1,200 डॉलर प्रति टन निर्यात मूल्य (MEP) निश्चित करण्यात आले. मात्र त्यामुळे तांदूळ निर्यातीत खोडा निर्माण होत असल्याने मागील महिन्यात सरकारकडून निर्यात मूल्य 950 डॉलर प्रति टनांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

मागणी वाढली

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 1,200 डॉलर प्रति मेट्रिक टन निर्यात मुल्यामुळे निर्यात खरेदी करार थंडावले होते. मात्र आता भारतीय नवीन बासमती तांदळास मोठी मागणी वाढली असल्याने 5 लाख मेट्रिक टन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. असे भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाचे अध्यक्ष प्रेम गर्ग यांनी सांगितले आहे.

आशिया खंडात तांदळाचे प्रामुख्याने उत्पादन होते. मात्र यावर्षी एल निनोच्या प्रभावा मळे आशियात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. परिणामी तांदळाचे उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे. त्यामुळे भारताने तांदळाची निर्यात वाढवल्यास त्याचा तात्काळ परिणाम जागतिक तांदूळ दर कमी होण्यास मदत होते.

error: Content is protected !!