Bater Palan : बटेरपालन व्यवसाय करेल मालामाल; शेतकऱ्यांसाठी ‘या’ आहेत प्रमुख प्रजाती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय (Bater Palan) करतात. पोल्ट्री व्यवसायावर ग्रामीण भागातील अनेक लोकांचे जीवन अवलंबून आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे बटेर पालनाबाबत इतकी जागरूकता नाही. मात्र, बटेर पक्षाचे मांस हे गुणवत्तापूर्ण असते. त्यास खरेदी करण्यासाठी लोक नेहमीच तयार असतात. ज्यामुळे या पक्षाच्या मांसाला अन्य पक्षांच्या तुलनेत किंमतही अधिक मिळते. याशिवाय ब्रॉयलर कोंबडी पालनाच्या तुलनेत यासाठी येणारा खर्च देखील अत्यंत कमी असतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण बटेर पक्षासाठीच्या (Bater Palan) विविध प्रजातींबाबत जाणून घेणार आहोत.

काय आहे बटेर पक्षी? (Bater Palan Business For Farmers)

बटेर (Bater Palan) हा आकाराने अगदी लहान असलेला पक्षी राज्यातील अनेक भागांमध्ये ‘लावी’, काही भागांमध्ये ‘लावरी’ या ग्रामीण नावांनी ओळखला जातो. या पक्षाच्या मांसाला अधिक मागणी असल्याने, शेतकरी बटेरपालनातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. देशात 1974 साली व्यावसायिक पालनासाठी बटेर पक्षाची जपानी प्रजाती विकसित करण्यात आली आहे. जपानी बटेर ही प्रजाती वर्षातून तीन ते चार वेळा पक्षांना जन्म देऊ शकते. या प्रजातीची मादी पक्षी 45 दिवसानंतर अंडी देण्यास सुरुवात करते. याव्यतिरिक्त उत्तरप्रदेशातील बरेली येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेकडून शेतकऱ्यांसाठी कैरी उत्तम, कैरी पर्ल, कैरी उज्ज्वल, कैरी श्वेता, कैरी ब्राउन, कैरी सुनहरी या बटेर पक्षाच्या प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत.

अजोलो खाण्यास देणे उत्तम

या सर्व प्रजातींमध्ये कैरी उत्तम ही प्रजाती भारतीय शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध असलेली प्रजाती आहे. या प्रजातीची अंडी देण्याची क्षमता अधिक असून, जन्मानंतर या प्रजातीचे पिल्लू 200 ते 250 ग्रॅम वजनापर्यंत वाढते. याशिवाय या पक्षामध्ये आहाराचे मांसामध्ये रूपांतर करण्याची क्षमता अधिक आहे. तसेच या पक्षाला दररोज 25 ते 30 ग्रॅम इतके खाद्य आवश्यक असते. या पक्षाला अजोलो खाण्यास देणे खूप उत्तम मानले जाते.

बटेर पालनाचे फायदे

  • बटेर पक्षी लवकर परिपक्व होतो. मादी पक्षी केवळ 6 ते 7 आठवड्यांमध्ये अंडी देण्यास सुरुवात करते. तर नर पक्षी केवळ 5 आठवड्यांमध्ये विक्री करण्याच्या लायक होतात.
  • एक मादी बटेर वर्षभरात जवळपास 200 ते 250 अंडी देते.
  • बटेर पालन करताना कोणतेही लसीकरण करण्याची गरज नसते.
  • बटेर पक्षाचे अंडे आणि मांस अमीनो आम्ल, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि खनिजांचा मुख्य स्रोत आहे.
  • कोंबडीच्या मांसापेक्षा बटेर पक्षाचे मांस खूप चवदार असते. यात फॅट कमी असते. त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
error: Content is protected !!