Bater Palan : बटेर पालनातून होईल बक्कळ कमाई; कमी खर्चात, अधिक नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या बटेर पालन (Bater Palan) (लावी पालन) व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी पाणी, कमी जागेत आणि कमी खर्चात देखील हा व्यवसाय केला जाऊ शकतो. ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगच्या तुलनेत अल्प गुंतवणुकीमध्ये देखील या व्ययसायातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जाऊ शकतो. तुम्हीही बटेर पालन व्यवसाय करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण या पोस्टच्या माध्यमातून बटेर पालनाबद्दल (Bater Palan) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बटेर (Bater Palan) हा आकाराने अगदी लहान असलेला पक्षी राज्यातील अनेक भागांमध्ये ‘लावी’, काही भागांमध्ये ‘लावरी’ या ग्रामीण नावांनी ओळखला जातो. त्यामुळे बटेर म्हटले की कोणत्याही नॉन-व्हेजिटेरियन माणसाच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या पक्षाचे मांस हे गुणवत्तापूर्ण असते. त्यामुळे लोक त्याची खरेदी करताना पैशाचा कोणताही विचार करत नाही. या पक्षाच्या मांसाला अन्य पक्षांच्या तुलनेत किंमतही अधिक मिळते. शिवाय ब्रॉयलर कोंबडी पालनाच्या तुलनेत यासाठी येणारा खर्च देखील अत्यंत कमी असतो. ज्यामुळे सध्या देशात जवळपास 32 दशलक्ष इतक्या जपानी बटेर प्रजातीच्या पक्षांचे व्यावसायिक स्वरूपात पालन केले जात आहे.

जपानी प्रजाती विकसित (Bater Palan Good Income Business)

पोल्ट्री फार्मिंग उद्योगामध्ये कोंबडीपालन, बदक पालन यानंतर बटेर पक्षांच्या पालनाला देशात तिसरे स्थान आहे. भारतात जवळपास 1970 च्या दशकापासून बटेर पक्ष्यांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर देशात 1974 साली व्यावसायिक पालनासाठी बटेर पक्षाची जपानी प्रजाती विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे तेव्हापासून बटेर पालन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

किती मिळतो नफा?

पोल्ट्री क्षेत्रातील जाणकारांच्या मते, भारतामध्ये जपानी बटेर पक्षाचे पालन सहजतेने केले जात आहे. विशेष म्हणजे त्याच्या पालनासाठी जोखीम देखील खूप कमी असते. मात्र असे असले तरी बटेरच्या पिल्लांची योग्य तापमानात काळजी घेणे आवश्यक असते. एका दिवसाचे बटेरची छोटे पिल्ले विकत घेऊन कोणी व्यवसाय सुरु करत असेल तर ही पिल्ले जवळपास 5 आठवड्यांमध्ये विक्रीसाठी तयार होतात. त्यास प्रति पक्षी 60 ते 80 रुपये इतका भाव मिळतो. दोन आठवड्यांची पिल्ले विकत घेतल्यास, एका पक्षावर जवळपास 30 ते 31 रुपये खर्च होतो. तर खर्च वजा जात आपल्याला त्यातून प्रति बटेर पक्षी निम्मा अर्थात 30 ते 50 रुपये नफा भेटू शकतो.

खाद्यासह शेडचा खर्चही कमी

बटेर पालन करण्यासाठी ब्रॉयलर कोंबडी पालनाच्या तुलनेत खूपच कमी जागा लागते. 3 फूट रुंद व 5 फूट उंच असलेले बांबू जाळीचे शेड बांधून, त्यात 40-45 बटेर पक्षी पाळले जाऊ शकतात. अर्थात 15 स्क्वेअर फूट जाळीमध्ये 3 लेअरमध्ये 130 ते 150 बटेर पक्षी पाळता येतात. बाजारात लहान पक्षांसाठीचे खाद्य उपलब्ध असते ते तुम्ही बटेर पक्षांसाठी खरेदी करू शकता. एका बटेर पक्षाला एका दिवसासाठी सरासरी 5-10 ग्रॅम खाद्य आवश्यक असते.

अंडी विक्रीतूनही नफा

बटेर हा मांस उत्पादनासाठी पाळला (Bater Palan) जात असला तरी त्याच्या अंड्यांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे पूर्ण विकसित झालेला 5 आठवड्यांचा पक्षी मांस विक्रीसाठी विक्री करण्याअगोदर त्यापासून मिळणाऱ्या अंड्यांमधून देखील आर्थिक कमाई केली जाऊ शकते. त्यामुळे या व्ययसायातून दुप्पट नफा कमावता येतो. ग्रामीण भागात लावीच्या अंड्यांना मोठी मागणी असते. तसेच सध्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता वाढल्याने शहरातही या अंड्यांना मागणी असते.

(बटेर पालन व्यवसाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना किंवा स्थानिक पशुवैद्यकीय विभागाकडे चौकशी करू शकतात.)

error: Content is protected !!